Press "Enter" to skip to content

तुर्भे बुद्रुक काँग्रेस कार्यकर्त्यांचा सेनाप्रवेश

शिवसेना सोडणाऱ्यांना दुसरीकडे करमत नाही,पाच पक्ष विरोधात असूनही मताधिक्य कायम : आ.भरत गोगावले

सिटी बेल लाइव्ह । पोलादपूर । शैलेश पालकर ।

गेल्यावर्षी विधानसभा निवडणुकीत काँग्रेससोबत राष्ट्रवादी काँग्रेस, शेकापक्ष, मनसे असे सगळे मिळून पाच राजकीय पक्ष विरोधात असूनही 2014 प्रमाणेच मताधिक्य कायम राहिले कारण निती चांगली ठेवली.कोणी काहीही बोलले तरी निवडून आपणच येणार, अशी परिस्थिती असून शिवसेना सोडणाऱ्यांना दुसरीकडे करमत नाही. फक्त शिवसेनाच सन्मानाने वागविते, असा सूचक इशारा आ.भरत गोगावले यांनी पोलादपूर तालुक्यातील तुर्भे बुद्रुक येथील छ.शिवाजी महाराज चौकात काँग्रेस कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याच्या जाहिर कार्यक्रमावेळी दिला.

यावेळी आ.गोगावले यांच्यासमवेत व्यासपिठावर राजिप सदस्य चंद्रकांत कळंबे, पुणे येथील हॉटेल व्यावसायिक अनिल गोळे, तालुकाप्रमुख निलेश अहिरे, पं.स.सदस्य यशवंत कासार, अनिल भिलारे, लक्ष्मण मोरे, दशरथ उतेकर, गणपत उतेकर, शहरप्रमुख सुरेश पवार आणि अन्य पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी तुर्भे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सरपंच वासंती भावेकर यांच्यासह तुर्भे पंचक्रोशीतील आध्यात्मिक क्षेत्रातील बुजूर्गदेखील यावेळी व्यासपिठावर उपस्थित होते.

आ.गोगावले यांनी यावेळी, बोरजच्या सभामंडपासोबतच तुर्भे येथील लक्ष्मी नारायण मंदिरासाठीही आमदारनिधीतून पत्र देणार असून मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे यांनी कोरोना काळात जनतेच्या आरोग्यासाठी अन्य विकासकामांसाठीचा निधी थांबविला होता. तो पुन्हा सुरू झाल्याने आता नळपाणी योजना, लोहारे तुर्भेखोंडा रस्त्यासह अनेक विकासकामे या परिसरात सुरू होणार आहेत, अशी ग्वाही दिली.

प्रारंभी तालुकाप्रमुख निलेश अहिरे यांनी, तुर्भे पंचक्रोशी शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून कायम राहणार असल्याचे ठाम मत व्यक्त केले. यावेळी राजिप सदस्य चंद्रकांत कळंबे यांनी, तुर्भे पंचक्रोशीत एमआयडीसी आणण्यासंदर्भात मोठया प्रमाणात प्रयत्न सुरू असून तालुक्यातील मतदार संख्येनुसार मतदानाची आकडेवारी वाढल्याखेरिज विकास होणार नसल्याने लॉकडाऊननंतर रोजगार गमावलेल्यांना तालुक्यात पुन्हा रोजगार संधी निर्माण करण्याची गरज असल्याचे सांगून गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मिळालेले मताधिक्य घटणार असले तर नेतृत्व कुठेच कमी पडले नसताना असे का होते, असा प्रश्न उपस्थित होतो, असा सवाल केला.

पुणे येथील हॉटेल व्यावसायिक व तुर्भे येथील सुपुत्र अनिल गोळे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेशावेळी आ. भरत गोगावले यांनी हाती भगवा देऊन स्वागत केले.

याप्रसंगी ज्ञानेश्वर बाबाजी वाडकर, गणपत गोळे, विष्णू गोळे, नारायण गोळे, पांडुरंग गोळे, रुपेश गोळे, रमेश गोळे, सिताराम मोरे, कृष्णा मोरे, हरिश्चंद्र कोंडाळकर, सचिन गोळे, शिवराम गोळे, सावित्री वाडकर, प्रथमेश गोळे, रितेश गोळे, दिपेश गोळे, सुनील गोळे, स्मिता वाडकर, विठाबाई गोळे, पुष्पा गोळे, मुक्ता गोळे, नैना गोळे, जयश्री गोळे, जयश्री गोळे, संगिता गोळे, अलका मोरे, नलीनी कोंडाळकर, जनाबाई मोरे, सविता गोळे, सुनिता गोळे, सुरेखा गोळे, शेवंती गोळे, बाबू गोळे, अशोक शेलार, सुवर्णा शेलार, किरण गोळे, रामचंद्र गोळे, अक्षय गोळे, बाबाजी वाडकर, लक्ष्मीबाई वाडकर, लक्ष्मी गोळे, जयवंती गोळे, विठाबाई झाडगे, सईबाई गोळे, प्रकाश गोळे, रंजना गोळे, विठाबाई गोळे, शशिकांत गोळे, दिपाली गोळे, शरद गोळे, निलिमा गोळे, विठोबा गोळे व विठ्ठल गोळे आदींनी शिवसेनेत प्रवेश केला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.