Press "Enter" to skip to content

पोलिस निरिक्षक अनिल विभूते यांनी साधला पत्रकारांशी संवाद

पोलिस ठाण्यातील पत्रकारांना कामकाजाची दिली माहिती

सिटी बेल लाइव्ह । काशिनाथ जाधव । पाताळगंगा ।

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतील पहिले वृत्तपत्र दर्पण ६ जानेवारी रोजी सुरू केले. हा दिवस दिवस देशभरात पञकार दिन म्हणून साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधत खालापूर पोलिस ठाण्यात पोलिस निरिक्षक अनिल विभूते आणि त्याच्या सहकारी वर्गानी संपूर्ण पोलीस स्टेशन मध्ये चालणाऱ्या कामकाजाची व पोलिस ठाण्यात उपयोगात येणाऱ्या शस्त्रास्त्रे माहिती पत्रकारांना देत पत्रकारांचा सन्मान करत पत्रकार दिन साजरा केला.

यावेळी खालापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी पत्रकारांचा सन्मान करून त्यांना पोलीस स्टेशनमध्ये चालणाऱ्या कामकाजाची माहिती दिली तर पोलिसांजवळ असलेल्या बंदुकीची माहिती साह्य पो.नि.शेखर लव्हे यांनी पत्रकारांना देऊन एक आगळा वेगळा पत्रकार दिन साजरा करण्यात आला, यावेळी तालुक्यातील अनेक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होतेे

याप्रसंगी पोलिस निरिक्षक अनिल विभूते यांनी विविध विषयावर चर्चा करीत खालापुर शहरात पत्रकारांसाठी हक्काचे ठिकाण व्हावे यासाठी पत्रकार भवन होण्यासाठी प्रयत्न करेन असे आश्वासन दिले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.