शिवसेना उपमहानगर प्रमुख कैलास बबनदादा पाटील यांची सिडकोकडे मागणी
सिटी बेल लाइव्ह / पनवेल (वार्ताहर)
तळोजा फेज १ ते हायवेपर्यंत रस्त्याचे डांबरीकरण सिडकोने तात्काळ करून द्यावे अशी मागणी शिवसेना उपमहानगर प्रमुख कैलास बबनदादा पाटील यांनी सिडकोचे चिफ इंजिनिअर गोडबोले यांच्याकडे केली आहे.
तळोजा फेज १ ते हायवेपर्यंत रेल्वे सब वे चे काम चालू होते. सदर सब वे हा १५ दिवसात सुरू होईल अस सिडकोकडून सांगितले जात आहे. अद्याप ते सुरू झालेले नाही तसेच आणखी काही महिन्यात सुरू होण्याची शक्यता नाही. तरी त्याच्याबाजुने जाणारा रस्ता अत्यंत खराब झाल्याने लोकाना जाण्यायेण्यासाठी प्रचंड त्रास होतो. तरी सिडकोने तातडीने हा रस्ता डांबरीकरण करून द्यावा अशी मागणीशिवसेना उपमहानगर प्रमुख कैलास बबनदादा पाटील यांनी सिडकोचे चिफ इंजिनिअर गोडबोले यांच्याकडे केली आहे.






Be First to Comment