सिटी बेल लाइव्ह । उरण । घनःश्याम कडू ।
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधत पेण येथील दुर्दैवी घटनेचा निषेध महिला संघटनांनी आज त्या मुलीच्या घरी जाऊन कुटूंबियांचे सांत्वन केले. तसेच गांधी चौकात या घटनेचा निषेध करून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.
पेण येथील अवघ्या अडीज वर्षीय मुलीवर नराधमाने बलात्कार करून तिची हत्या करण्याची दुर्दैवी घटना घडली. पोलिसांनी नराधम आरोपीला अटक केली आहे. या दुर्दैवी घटनेचा निषेध आज उरणमधील महिलांनी केला आहे. महिलांनी दुर्दैवी मुलीच्या पेण येथील घरी जाऊन मुलीच्या कुटूंबियांचे सांत्वन केले. यावेळी महिला वर्गांनी कुटूंबियांना मदतीचा हातभार दिला.
त्यानंतर उरण मधील गांधी चौकात या दुर्दैवी घटनेचा निषेध करून नराधम आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. यावेळी आयोजक जनवादी महीला संघटनेच्या हेमलताताई पाटील, शेतकरी कामगार पक्ष महिला आघाडी अध्यक्षा सीमा घरत, माजी उपनगराध्यक्षा नाहीदा ठाकुर, कामगारनेते भुषण पाटील, उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, संतोष पवार आणि प्रा. राजेंद्र मढवी, संजय ठाकूर, ज्योतीताई म्हात्रे, जि.अध्यक्षा जनवादी महीला संघटना,नयना पाटील,शेकाप शहर अध्यक्षा, रंजना पाटील, सामिया बुबेरे,रेखा घरत, चंपाताई पाटील, कुसूम ठाकुर, अनेक सामाजिक संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.








Be First to Comment