पोलिस काका, पोलिस दिदी ब्रिद वाक्य
सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।
रसायनी पोलिस ठाण्याच्या वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अलि महंमद मुल्ला यांच्यावतीने रसायनी परिसरातील विद्यार्थी/विद्यार्थीनींसाठी तसेच शिक्षकांना काही अडचण आल्यास रसायनी पोलिसांकडून राबविण्यात येणाऱ्या कम्युनिटी पोलिसांमार्फत “पोलिस काका, पोलिस दिदी”यांवर रसायनी पोलिस ठाण्याच्यावतीने पिल्लईं महाविद्यालय,जनता हायस्कूल व प्रिआ स्कूल आदी परीसरात रेझिंग डे सप्ताह निमित्त भेट देऊन “पोलिस काका, पोलिस दिदी”यांचे मोबाईल नंबर सह बॅनर लावून मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अलि महंमद मुल्ला यांनी बोलताना सांगितले की, रसायनी परीसरातील शालांतील विद्यार्थी व विद्यार्थिनी तक्रार देत नाहीत, यासाठी गुन्हा रोखण्यासाठी तसेच त्यांना मार्गदर्शन व्हावे यासाठी “पोलिस काका, पोलिस दिदी”यांना फोन करून पोलिसांना माहिती देण्यात यावी असे सहाय्यक पोलीस निरीक्षक अलि मुल्ला यांनी सांगितले.
यासाठी रसायनी पोलिस ठाण्याच्या वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अलि मुल्ला, पोलिस नाईंक मंगेश लांगी, पोलिस नाईक पाटील, पोलिस बैकर अथक परिश्रम घेत आहेत.








Be First to Comment