Press "Enter" to skip to content

29 जानेवारी रोजी MMRDA चे काम बंद आंदोलनाचा संघर्ष समितीचा इशारा

सिटी बेल लाइव्ह । उरण । सुनिल ठाकुर ।

न्हावा शिवडी सागरी सेतू मच्छीमार बांधवांना नुकसान भरपाई मिळविण्यासाठी न्हावा, गव्हाण, घारापुरी ग्राम पंचायत हद्दीतील ग्रामस्थांचा MMRDA च्या कोपर येथील टाटा कंपनी चे प्रोजेक्ट वर शुक्रवार दिनांक २९ जानेवारी रोजी सकाळी ठीक ९ वाजता काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय गव्हाण भागातील सर्व पक्षीय संघर्ष समिती ने एक मताने घेण्यात आल्याची सयुक्तिक माहिती खालील पदाधिकाऱ्यांनी दिली.

न्हावा ग्राम पंचायतीचे सरपंच श्री जितेंद्र म्हात्रे, गव्हाण सरपंच सौ. स्नेहलता भगत मॅडम, घारापुरी चे सरपंच श्री बळीराम ठाकूर, न्हावा ग्राम सुधार मंडळ अध्यक्ष श्री आशिष पाटील, श्री हनुमान भोईर माजी सरपंच न्हावा, श्री वसंत म्हात्रे माजी सरपंच गव्हाण,श्री चंद्रकांत शेठ भोईर, न्हावा, तंटा मुक्ती समिती अध्यक्ष श्री प्रदीप ठाकूर, न्हावा उप सरपंच सौ .साधना तांडेल गव्हाण उप सरपंच श्री सचिन घरत, घारापुरी उप सरपंच सचिन म्हात्रे न्हावा माजी उपसरपंच श्री किसन पाटील, श्री सागर शेठ ठाकूर, श्री हरिश्चंद्र म्हात्रे , न्हावा शाखा प्रमुख श्री हरेश्र्वर म्हात्रे, कोपर चे ग्राम पंचायत सदस्य श्री विजय घरत, सौ .माई भोईर तसेच श्री हेमंत ठाकूर गव्हाण, कोपर चे चंद्रकांत घरत, गौरव म्हात्रे खाडी गावचे श्री सी. एल ठाकूर ह्या सर्वांनी प्रतिनिधीशी बोलताना सयुक्तिक माहिती दिली.

त्या साठी गावोगावी जाऊन हे स्थानिक पातळीवर वरील कार्यकर्ते जनजागृती करीत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.