सिटी बेल लाइव्ह । उरण । सुनिल ठाकुर ।
चाईल्ड केअर सामाजीक संस्था, उरण चे अध्यक्ष श्री विकास कडू यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बाळ संस्कार केंद्र उरण येथील मुलाना खाऊ वाटप तसेच धान्य वाटप करण्यात आले. तसेच संस्थेच्या उरण तालुका मर्यादित रांगोळी, किल्ले, निबंध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्यांचे बक्षीस वितरण करण्यात आले.
यामध्ये रांगोळी स्पर्धा प्रथम क्रमांक -सत्यजित कडू (सोनारी ) द्वितीय क्रमांक -नितीन पाटील (भेंडखळ )तृतीय क्रमांक -अपर्णा पाटील (पागोटे )
निबंध स्पर्धा प्रथम क्रमांक -स्वप्निल घरत (भेंडखळ )द्वितीय क्रमांक -हेमाली म्हात्रे (कोप्रोली )तृतीय क्रमांक -सुनील ठाकूर पत्रकार (दिघोडे )
किल्ले स्पर्धा प्रथम क्रमांक -जाणता राजा मंडळ (पागोटे )द्वितीय क्रमांक -पार्थिव पाटील (पिरकोन )तुतीय क्रमांक -साईश विश्वनाथ पाटील (दिघोडे )
विजेत्याना मान्यवरांच्या हस्ते संस्थेचे प्रमाण पत्र, ट्राफी, देऊन गौरविण्यात आले.

सदर कार्यक्रमात श्री नरेश म्हात्रे (उरण),श्री सुनील ठाकूर पत्रकार (दिघोडे )यांना संस्थे कडून कोविड 19 प्रमाण पत्र देण्यात आले .
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती श्री नरेश म्हात्रे (रायगड भुषण )श्री रुपेश पाटील (प्रसिद्ध चित्रकार ).श्री विवेक पाटील (समाज सेवक पागोटे )तसेच संस्थे चे श्री विकास कडू (अध्यक्ष )श्री विक्रांत कडू (कार्याध्यक्ष )कु. अभिषेक माळी (सचिव )कु. ह्रितिक पाटील (उपाध्यक्ष )कु. हर्षद शिंदे (खजिनदार )कु उद्धव कोळी, कु आदित्य पारवे, कु रोशन धुमाळ, श्री विपुल कडू आदी सह बालसंस्कार केंद्रातील मुले पालकवर्ग उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री विवेक पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री विकास कडू यांनी केले








Be First to Comment