Press "Enter" to skip to content

३०/३१ जानेवारीला ऑनलाईन पद्धतीने होणार दहावे राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलन

संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. राजन गवस, उदघाटक डॉ. गणेश देवी तर डॉ. रावसाहेब कसबे करणार समारोप

सिटी बेल लाइव्ह । मुंबई । पंकजकुमार पाटील ।

३० आणि ३१ जानेवारी २०२१ रोजी ऑनलाईन पद्धतीने दहावे राज्यव्यापी शिक्षक साहित्य पार पडणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. राजन गवस यांची निवड झाली आहे. संमेलनाचे उद्घाटन राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष, पद्मश्री डॉ. गणेश देवी करणार आहेत. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रावसाहेब कसबे करणार समारोप, अशी माहिती शिक्षक साहित्य संमेलन संस्थेचे अध्यक्ष जयवंत पाटील यांनी दिली आहे.

शिक्षकांच्या साहित्य प्रज्ञेचा शोध घेण्यासाठी त्याचबरोबर भाषा आणि साहित्याचे अध्यापन आशय समृद्धीसाठी आमदार कपिल पाटील यांच्या संकल्पनेतून हे शिक्षक संमेलन सुरु झाले. आजपर्यंत अशी नऊ संमेलनं यापूर्वी मुंबई, ठाणे, बुलढाणा, रत्नागिरी, गोंदिया, विरार येथे मोठ्या दिमाखात पार पडली आहेत. कवयित्री नीरजा, डॉ. सदानंद मोरे, नाटककार शफाअत खान, रमेश इंगळे उत्रादकर, लोकशाहीर संभाजी भगत, प्रविण बांदेकर, जयवंत पाटील, प्रा. वामन केंद्रे, डॉ. प्रज्ञा दया पवार यांनी यापूर्वीच्या संमेलनाचे अध्यक्षपद भूषवलेले आहे. खासदार शरद पवार, ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, हिंदूकार डॉ. भालचंद्र नेमाडे, ख्यातनाम विचारवंत प्रा. पुष्पा भावे, ज्येष्ठ नाट्यकर्मी सुलभा देशपांडे, नितीन वैद्य, वसंत आबाजी डहाके, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, रंगनाथ पठारे, जावेद अख्तर, निखिल वागळे, फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी यापूर्वीच्या संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली होती. यंदा ऑनलाईन पद्धतीने होणार्‍या दहाव्या राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनाला राज्यभरातून मराठी साहित्यावर प्रेम करणारे शिक्षक, मान्यवर हजेरी लावावी असं आवाहन अशी माहिती शिक्षक साहित्य संमेलन संस्थेचे अध्यक्ष जयवंत पाटील यांनी केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.