सिटी बेल लाइव्ह । मुकुंद रांजाणे । माथेरान ।
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र शाळा बंद करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आगामी शैक्षणिक प्रगतीचा आलेख खालावू नये यासाठी रायगड जिल्ह्यातील तज्ञ शिक्षकांमार्फत विद्यार्थ्यांना १ जानेवारी पासून ऑनलाइन अभ्यासक्रम मराठी विभाग डायट-पनवेल यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आला आहे.याचे आयोजन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पनवेल. आणि रायगड जिल्हा माध्यमिक शिक्षण विभाग यानी केेले आहे.
सायंकाळी ७ ते ८ दरम्यान शिक्षणाधिकारी आणि प्राचार्या यांच्यामार्फत
Youtube आणि facebook द्वारे विद्यार्थ्यांनी live कनेक्ट होण्याचे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पनवेल यांनी केले आहे. या ऑनलाइन पध्दतीने विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण होणार असून परीक्षेच्या वेळी कोणत्याही प्रश्नांची उत्तरे अगदी सहजपणे सोपस्कार होऊ शकतात.
सध्यातरी जवळपास सत्तर हजार विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येत आहे.याकामी मा.प्राचार्या चंद्रकला ठोके,
भाऊसाहेब थोरात ,शिक्षणाधिकारी (माध्य.),अधिव्याख्याता संजय वाघ,अधिव्याख्याता सुभाष महाजन, अधिव्याख्याता – रामदास टोने
विषय साहाय्यक – हेमंत गोयजी,विषय साहाय्यक – सविता अष्टेकर,तांत्रिक जबाबदारी – विषय साहाय्यक – गणेश कुताळ, यांनी मेहनत घेतली.
नियोजन गेली 20 दिवसांच्या पासून सुरू असून हे प्रशिक्षण १३ फेब्रुवारी पर्यंत असणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यात आपला सहभाग नोंदवावा असेही संस्थेच्या वतीने आवाहन केले आहे.
विशेष म्हणजे ह्या शिक्षण पद्धती साठी
के.डी.पाटील(अलिबाग),संदीपघरत(अलिबाग),संघपाल वाठोरे (माथेरान),मंगेश कदम(म्हसळा),स्मिता भोईर (कर्जत),दिलीप पडळकर(पेण),बी.जी. शिकारे(अलिबाग) शलाका वेलणकर (पनवेल),प्रांजळ पाठक(पेण),संतोष कांबरी (कर्जत),सुनील खेडकर(पेण), वर्षा नाईक (अलिबाग) नरेंद्र म्हात्रे (पेण) हे तज्ज्ञ मार्गदर्शक लाभले आहेत.








Be First to Comment