Press "Enter" to skip to content

डायोसिस ऑफ बिलिवर्सं चर्चंच्या स्वयंसेवकांकडून गोरगरीबांना जिवनावश्यक वस्तूंचे वाटप

सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।

डायोसिस ऑफ बिलिवर्सं इस्टर्नं ट्रस्टच्या माध्यमातून समाजाप्रती प्रेम व दिनदुबल्यांवर प्रेम करण्याची मानसिकता असून गोरगरीबांना जिवनावश्यक वस्तूं देण्यासाठी या चर्चंच्या सदस्यांनी पुढाकार घेतला आहे.सध्या थंडिचे वातावरण असल्याने बिलिवर्सं चर्चंच्या स्वयंसेवकांकडून गोरगरीबांना ब्लॅकेट व गरम कपड्यांचे वाटप होताना दिसत आहे.तसेच रेल्वे स्थानकानजिकच्या गोरगरीबांना जिवनावश्यक वस्तूंचे वाटप केले जात आहे.

या स्वयंसेवकांनी नुकताच पनवेल रेल्वे स्थानकानजीकच्या झोपडपट्टी भागातील सत्तावीस गरीब आणि गरजू कुटूंबांना तसेच विधवा महिलांना जिवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.यावेली गोरगरीबांच्या कुटूंबाला काहीअंश किराणा सामान मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण दिसून आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.