Press "Enter" to skip to content

राष्ट्रीय युवा दिनानिमित्त रायगड जिल्हास्तरीय खुली निबंध स्पर्धा

सिटी बेल लाइव्ह । पाणदिवे । प्रतिनिधी ।

युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय ,भारत सरकार अंतर्गत काम करणाऱ्या नेहरू युवा केंद्र अलिबाग यांच्या संकल्पनेतुन महाराष्ट्र युवा प्रतिष्ठान पाणदिवे आणि वटवृक्ष सामाजिक संस्था- उलवे यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक १२ जानेवारी स्वामी विवेकानंद जयंती चे औचित्य साधून राष्ट्रीय युवा दिनानिमित्त निबंध स्पर्धा खुल्या गटासांठी आयोजित केली आहे.

१२ जानेवारी ते १९ जानेवारी या युवा सप्ताहच्या निमित्ताने पाणी हा विषय हाती घेत पाणी वाचवा -जीवन वाचवा ,वाढती लोकसंख्या आणि पाण्याचे नियोजन ,जल संवर्धन काळाची गरज ,पाणी आडवा-पाणी जीरवा यापैकी कोणत्याही एका विषयावर स्पर्धकांनी आपले निबंध १७ जानेवारी २०२१ पर्यत लिहून अथवा टायपिंग करून पीडीएफ फाईलने खालील क्रमांकावर पाठवायचे आहे असे मत आयोजक मनोज पाटील व किरण मढवी यांनी व्यक्त केले आहे.

प्रथम तीन क्रमांकाना अनुक्रमे १५००/-₹, १०००/-₹, व ५००/-₹ तसेच सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येईल. शिवाय सर्व सहभागी स्पर्धकांनाही नेहरू युवा केंद्र अलिबाग चे प्रमाणपत्र पीडीएफ फाईल ने देण्यात येतील. तरी आपण जास्तीत जास्त संख्येने ह्या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन मनोज पाटील यांनी केले आहे.
अधिक माहीतीसाठी ९६६४७७०६१४ / ९८७०९५५५०५ या क्रमांकावर व्हाटस् अँपद्वारे माहीती मिळवू शकता.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.