सिटी बेल लाइव्ह । मुकुंद रांजाणे । माथेरान ।
९ जानेवारी रोजी रायगड जिल्हा परिषद करालेवडी येथे विद्यार्थ्याना लॉक डाऊन काळात विद्यार्थ्याना अध्ययन करणे सुलभ व्हावे म्हणून या शाळेत हवालदार, समाजसेवक यांच्या सहकार्याच्या माध्यमातून केंद्रातील आदर्श शिक्षक धनाजी देसले सर, जाधव सर यांनी इंटरनेट सेवा सुरू केली आहे.
यामुळे विद्यार्थ्याना कोरोना विषयक नियम पाळत अभ्यास करणे सुलभ होईल.शिवाय ज्या शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षण ऑनलाईन देणे कठीण आहे तेथे सुलभ होईल असा आदर्श निर्माण केला आहे यासाठी गटशिक्षणाधिकारी संतोष दौंड यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे मान्यवर उपस्थित होते.केंद्रप्रमुख नारायण सोनवणे यांच्या शुभहस्ते या महत्वपूर्ण कार्याचा शुभारंभ करण्यात आला.








Be First to Comment