सिटी बेल लाइव्ह । उरण । रमेश थळी ।
रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय व लोकनेते दि बा पाटील ज्युनीयर कॉलेज जासई विद्यालयाच्या उपशिक्षिका प्रमीला ज्ञानेश्वर गावंड दीर्घ सेवेतून ३१ मार्च २०२०मध्ये सेवा निवृत्त झाल्या होत्या परंतु मार्च महिन्यापासून लोक डाउन सुरू असल्यामुले हा सोहळा होवू शकला नाही हा सोहळा सावीत्रीबाई फुले जयंती व महिला मुक्ती दीनाचे यांच्या दीनाचे औचित्य साधून संपन्न झाला.
या प्रसंगी त्यांना विद्यालयाच्या वतीने साडी व विविध भेट वस्तु देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात शासकीय बंधन असल्याने अधिक मान्यवर हजर नव्हते त्यांनी फोन वरून प्रमीला गावंड यांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या डॉ सौ शिल्पा गंदीगुडे,अशोक पाटील, मनीषाताई घरत,मंदाताई पाटील, उपस्थित होत्या.
या प्रसंगी प्रमीला गावंड यांनी आपल्या दीर्घ सेवेचा अनुभव व्यक्त करून रयत शिक्षण संस्थेची कृत्यन्यता व्यक्त केली या कार्यक्रमाचे सूत्र संचलन सौ दर्शना माळी मेडम यांनी केले तर आभार जी आर म्हात्रे यांनी मानून या कार्यक्रमाची सांगता झाली.








Be First to Comment