सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड ।
सर्वोत्कृष्ट पीएचडी प्रबंधाच्या पारितोषिकासाठी डॉ. नीतिन आरेकर यांच्या पीएचडी प्रबंधाची समितीने एकमताने निवड केली आहे.
डॉ. नीतिन आरेकर यांच्या पीएचडी प्रबंधाचा विषय “वाड्मय समीक्षक प्रा. वा. ल. कुलकर्णी – चिकित्सक अभ्यास” असा आहे. या पुरस्कारांचे वितरण दिनांक 27 फेब्रुवारी 2021 रोजी मराठी भाषा दिनी मान्यवरांच्या हस्ते केले जाणार असल्याचे मराठी विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. वंदना महाजन यांनी सांगितले.
मागील गेल्या 25 वर्षांपासून ज्येष्ठ नामवंत संशोधक प्रा. अ. का. प्रियोळकर स्मृती-पारितोषिक प्रदान केले जातात. दरवर्षी मराठीतील एका नामवंत ज्येष्ठ संशोधकास आणि मुंबई विद्यापीठात सादर केलेल्या पीएचडी प्रबंधापैकी एका सर्वोत्कृष्ट पीएचडी प्रबंधास हे पुरस्कार दिले जातात उपकुलसचिव (जनसंपर्क) डॉ. लीलाधर बन्सोड यांनी सांगितले.
डॉ. नितिन आरेकर यांनी ‘ये है मुंबई मेरी जान’ आणि शिवगंध या पुस्तकांचे लेखन केले आहे.
"मी मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाचा, प्रा. अ. का. प्रियोळकर पारितोषिक समितीचा आभारी आहे.
त्याचबरोबर माझे मार्गदर्शक डॉ. कैलास जोशी, डॉ वसंत पाटणकर, सीएचएम महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मंजू पाठक, आमची हैद्राबाद (सिंध) नॅशनल कॉलेजीएट बोर्ड ही संस्था, स्वर्गीय प्रा. डॉ ज्योतिका ओझरकर यांचाही मी ऋणी आहे. माझी आई स्वर्गीय प्रा. विलासिनी आरेकर, वडील ऍड दत्ता आरेकर, बंधू डॉ. प्रशांत सावले, पत्नी सौ माधवी व प्रा सुभाष आठवले यांच्या सहकार्याचा मी विशेष उल्लेख करीन.
----डॉ. नीतिन आरेकर








Be First to Comment