शेतकरीवर्गामध्ये आनंदी वातावरण : खासदार तटकरेंचे मानले आभार
सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार ।
पेण तालुक्यातील खारढोबी, खारपाले, जुईअब्बास, देवळी आदी भागातील शेत जमिनीत धरमतर खाडीचे खारे पाणी शिरून शेत जमीन नापीक होत असल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत होता. खारभूमी विभागाचा खाऱ्या पाण्याचा गेली अनेक वर्ष प्रलंबित असलेला प्रश्न खासदार सुनिल तटकरे व रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या प्रयत्नाने व आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या पाठपुरावामुळे पेण तालुक्यातील खारभूमी बांधाचे काम जेएसडब्लू कंपनीच्या सीएसआर फंडातून करण्यात येणार असल्यामुळे ग्रामस्थ व शेतकरी वर्गामध्ये आनंदी वातावरण निर्माण झाले असून शेतकरी बांधवांनी खासदार ताटकरेंचे आभार मानले आहेत.
दरम्यान बांधाच्या कामासाठी फंडच उपलब्ध नसल्याचे खारभूमी विभागाकडून सतत सांगण्यात येत होते म्हणून खासदार सुनिल तटकरे यांनी बांधाचे काम सीएसआर फंडातून करावे अशा सूचना जेएसडब्ल्यू प्रशासनाला केल्या होत्या त्यानुसार या कामास सुरवात होत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा चिटणीस परशुराम मोकल यांनी दिली.
खारभूमी बांधाच्या कामा संधर्भात बाधित शेतकरी संघटना खारपाले, आनंद नगर,जुईअब्बास सर्व जोहले यांच्या वतीने खासदार सुनील तटकरे व रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांना निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर आमदार अनिकेत तटकरे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे जिल्हाधिकारी, जे एस डब्लू प्रशासन अधिकारी, खारभूमी विभाग अधिकारी व संबंधित शेतकरी संघटना व शेतकरी यांच्या सह जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे दि २८/०९/२०२० रोजी झालेल्या बैठकीत शेतालगत बंधारा बांधण्याचे काम खारभूमी विभागाच्या मार्गदर्शनाने व देखरेखीखाली जेएसडब्लू कंपनी प्रशासनाच्या सीएसआर फंडातून करण्याचे सर्वानुमते ठरले होते त्याच अनुषंगाने शुक्रवार दि .०८/०१/२०२१ रोजी खारभूमी विभागाच्या सोनल गायकवाड व इतर अधिकारीवर्ग व बाधित शेतकरी यांच्या उपस्थितीत जुईअब्बास स्कीमचा सर्व्हे करण्यात आला .
यावेळी खारपाले,जुईअब्बास,आनंदनगर शेतकरी प्रभाकर लक्ष्मण पाटील, विजय जयराम पाटील, प्रभाकर महादू पाटील, दामोदर नारायण पाटील, मंगेश रघुनाथ मढवी, गणपत दामोदर पाटील, विश्वनाथ शिंदे, नथुराम थळे, सखाराम शिंदे व सर्व शेतकरी उपस्थित होते. याकामी पेण तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष दयानंद भगत, राष्ट्रवादी जिल्हा चिटणीस परशुराम मोकल, गडब माजी सरपंच विजय पाटील यांनी याबाबत खासदार सुनिल तटकरे यांची भेट घेऊन पाठपुरावा केला गेला.








Be First to Comment