सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।
मोहोपाडा येथील मरिआईं मंदिराजवळील स्मिता अपार्टमेंटमधील सहा नंबर गाल्यात कापूस गादीचे गोडावून होते.या गोडावूनमध्ये दोघे झोपेत असताना आग लागल्याने यात होरपळून एकाचा जागीच मृत्यू झाला होता तर दुसराही आगीत होरपळल्याने त्याच्यावर सर्वंप्रथम रोडपाली तळोजा येथील स्वास्था हाॅस्पिटलात उपचार सुरू होते.आगीत साठटक्के पेक्षा जास्त होरपळल्याने चार दिवसांच्या उपचारानंतर मुंबई येथील जे जे हाॅस्पिटलात गणेश हनुमंत राऊत यांस दाखल करण्यात आले परंतु उपचार सुरू असताना त्याची प्राणज्योत मावळली.
मोहोपाडा येथील गोडावूनमध्ये गोपाळ कुमार पंचानन चक्रवर्ती (वय ३०) याचा जागीच मृत्यू झाला होता.तर साथीदार गणेश हनुमंत राऊत हा साठ टक्केपेक्षा जास्त भाजला होता. कापूस गादी गोडाऊनला आग लागल्याने ओरडण्याचा आवाज आल्याने आसपासचे ग्रामस्थ जागे झाले व त्यांनी रसायनी पोलिसांना करविले होते.यावेली पोलिस ठाण्याच्या वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी एमआयडीसी अग्निशमन दलाला पाचारण करून घटनास्थळी धाव घेऊन अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणली.
गोडावूनमध्ये कापूस असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले होते.यात एकाचा जागीच होरपळून मृत्यू झाला होता तर दुसराही गंभीर भाजल्याने त्याला उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.परंतु आठवड्याभराच्या उपचारानंतर जे.जे.हाॅस्पिटलात गणेश हनुमंत राऊत याचाही मृत्यू झाला आहे.








Be First to Comment