Press "Enter" to skip to content

उक्रुळ गाव ते स्मशानभूमी रस्त्यासाठी 7 लाखांचा निधी मंजूर

ग्रामस्थांकडून मानले आभार..

सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड ।

रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी दिलेला शब्द पूर्ण केला आहे, मौजे उक्रुळ गाव ते स्मशानभूमी रस्त्यासाठी 7 लक्ष निधी मंजूर करून दिला आहे, ग्रामस्थांनी घारे यांचे मानले आभार मानले आहेत.

कर्जत तालुक्यातील मौजे उक्रुळ गावातील नागरिकांना काही दिवसांपूर्वी भेडसावणाऱ्या स्मशानभूमी रस्त्याची समस्या सोडविण्यासाठी राजिप उपाध्यक्ष सुधाकर घारे यांची भेट घेवून रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती, दिलेला शब्द पुरे करणारे सुधाकर घारे यांनी तत्काळ जिल्हा परिषद सेस निधीतुन 7 लक्ष निधी मंजूर करून देऊन नागरिकांना दिलेला शब्द पूर्ण केला. मौजे उक्रुळ येथील ग्रामस्थांनी आभार मानले आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.