Press "Enter" to skip to content

आंतर जिल्हा बदली टप्पा क्रमांक चार तात्काळ राबवावा

ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ व विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे आग्रही मागणी


सिटी बेल लाइव्ह / गोवे-कोलाड ( विश्वास निकम )

३१ जुलै २०२० अखेर आंतरजिल्हा बदली टप्पा क्रमांक ४ तात्काळ राबविण्यात यावा यासाठी राज्यातील हजारो शिक्षकांच्या वतीने महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या प्राथमिक विभागाने ग्राम विकास मंत्री नामदार हसनजी मुश्रीफ, व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, अतिरिक्त मुख्य सचिव ग्रामविकास विभाग मंत्रालय शिक्षक परिषदेचे संस्थापक आमदार संजय केळकर, नागपूर विभागाचे शिक्षक आमदार नागो गाणार,नाशिक पदवीधर मतदारांचे आमदार डॉ सुधीर तांबे, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे ,या आमदार मंत्री महोदय व मुख्यसचिव याना संघटनेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांच्यामार्फत ईमेलद्वारे निवेदन सादर करण्यात आले आहे अशी माहिती संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख रविकिरण पालवे यांनी दिली सादर केलेल्या निवेदनात आंतर जिल्हा बदली टप्पा क्रमांक ४ तात्काळ राबवण्यात यावा ,तसेच जिल्हा परिषदेतील अन्य वर्ग-३ व वर्ग-४च्या बदल्या ३१ जुलै २०२० अखेर करावयाचे आहेत असे कळविले आहे,त्यादृष्टीने राज्यभरातून हजारो शिक्षकांची गैरसोय दूर करण्याच्या हेतूने ३१ जुलै पूर्वी आंतरजिल्हा बदल्याकरिता खालील बाबीवर विचार करून बदल्या करण्याबाबतचे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या वतीने ईमेलद्वारे निवेदन संघटनेचे राज्यध्यक्ष राजेश सुर्वे यांनी दिली असल्याचे दिलेल्या पत्रकात म्हटले आहे,

प्रामुख्याने निवेदनातून केलेल्या मागण्या,

१)अंतर जिल्हा बदली टप्पा चार साठी NICपुणे येथे १० फेब्रुवारी २०२०अखेर ऑनलाइन फॉर्मभरलेले उमेदवारांना प्राधान्य देण्यात येऊन बदली प्रक्रिया राबवावी ,नवीन फॉर्म भरण्याची आवश्यकता नसावी जेणेकरून कमी वेळेत प्रक्रिया राबविणे सहज शक्य होईल .२) गेली दहा-बारा वर्षांपासून पती-पत्नी वेगळ्या जिल्ह्यात सेवेत असून अंतर जिल्हा बदली पती-पत्नी एकत्रीकरण न झाल्याने आणि त्याचे कौटुंबिक स्वास्थ्य बिघडले आहे पती-पत्नी एकत्रीकरण करण्यास प्राधान्य देण्यात यावे.
३)अंतर जिल्हा बदली करिता नियमावली शून्य बिंदू नामावली रोस्टर ला प्राधान्य देण्यात यावे.४)कोकण विभागासाठी 10% रिक्त पदे ठेवण्याची अट रद्द करून बदली प्रक्रिया करावी सर्व बदली प्राप्त शिक्षकांना तत्काळ कार्यमुक्त करण्यात यावे. आशा चार प्रमुख मागण्याचे निवेदन सादर केले आहे,
उपरोक्त वरील मुद्याचा सहानुभूतीने करून बदल्या करण्यात याव्यात यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे संस्थापक आमदार संजयजी केळकर साहेब यांच्या मार्फत राज्यध्यक्ष राजेश सुर्वे यांनी संघटनेच्या वतीने आशा चार प्रमुख मागण्याचे निवेदन सादर केले आहे,
कार्याध्यक्ष मधुकर उन्हाळे,बाबुराव पवार, सुनील पाटील,कार्यवाह सुधाकर मस्के,संघटन मंत्री सुरेश दंडवते, राज्य संपर्क प्रमुख रावसाहेब रोहोकले गुरूजी ,राज्य सहकार्यवाह पुरुषोत्तम काळे , कोषाध्यक्ष संजय पगार,राज्य उपाध्यक्ष प्रकाश चतरकर,अविनाश तालापलीवार,मंच्छित्र गुरमे,प्रकाश चुनारकर,राजेंद्र नांद्रे, मंगेश जैवाळ,बाबुराव गाडेकर , सुनील केणे,संजय निजापकर,भरत मडके,डॉ सतपाल‌ सोवळे प्रविण ठुबे,विकास गवते,संजय शेळके , महादेव चाटे,श्रीराम बोचरे,डि.एम.पंडागळे, दिलीप पाटील,भिका सपकाळे विजय साळवे , विलास बोबडे , राजेंद्र शिंगाडे ,रमेश गोहील,आबा बच्छाव,अवधूत वानखेडे ,निळकंठ गायकवाड ,प्रकाश गुरव ,प्रशांत वाघमारे,भगवान घरत,शांताराम घुले,संजय कोठाळे , भगवान जायभाय,कृष्णकांत मलिक , उमेश पाटील, शैलेश चौकशे ,राजेंद्र चौधरी,भिका सपकाळे, इ ग्राम विकास विभागाकडे निवेदनाद्वारे मागणी केली असल्याची माहिती राज्य प्रसिद्धीप्रमुख रविकिरण पालवे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकांव्ये दिली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.