Press "Enter" to skip to content

गोखले महाविद्यालयात रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

सिटी बेल लाइव्ह । श्रीवर्धन । केतन माळवदे ।

येथील गोखले एज्युकेशन सोसायटीचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, श्रीवर्धन येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागा अंतर्गत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

रक्तदान शिबीराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्री. श्रीनिवास जोशी यांचे अध्यक्षतेखाली व श्रीवर्धन येथील उप जिल्हा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मधुकर ढवळे यांच्या हस्ते झाले यावेळी डॉ ढवळे यांनी म्हटले कि, ‘ कोरोना काळात देशात व राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता, समाजात एकवेळ अन्न मिळेल, पैसे मिळतील, पण ऐनवेळी रक्त मिळणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती, गोखले महाविद्यालयाने पुढाकार घेऊन स्तुत्य उपक्रम राबवीला आहे’.

तर अध्यक्ष पदावरून बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ श्री. श्रीधर जोशी यांनी एन.एस.एस. विभागाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबीराचे कौतुक केले, ‘स्वयंसेवक व विद्यार्थ्यांमध्ये समाज सेवेची व दात्रूत्वाची भावना वाढविण्यात एन.एस.एस.विभाग सतत मोलाची भूमिका बजावत आहे, व रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे समाजात दातृत्वाची भावना वाढीस लागावी अशी अपेक्षा व्यक्त केली.’

या वेळी रायगड जिल्हा रुग्णालय अलिबाग, येथील रक्त संक्रमण अधिकारी, श्री. दिपक गोसावी यांचे मार्गदर्शनाखाली रक्तदान अधिकारी श्री. घरत, श्री.घाडगे, कु. खुलूद नजोरी. यांनी रक्त संकलनात विशेष परीश्रम घेतले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. श्री. वाल्मिक जोंधळे यांनी केले तर एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी प्रा. श्री. किशोर लहारे सर यांनी सर्वांचे आभार प्रदर्शित केले. या रक्तदान शिबीरामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, स्वयंसेवक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते, तसेच श्रीवर्धन शहरातील नागरिकांनी देखील स्वेच्छेने रक्तदान शिबीरात सहभाग घेतला.

महाविद्यालयातील प्रा. श्री. राजु गोरूले, प्रा. श्री.शंकर भोईर, कार्यक्रम अधिकारी प्रा. श्री. वाल्मिक जोंधळे, ज्युनिअर क्लार्क श्री. प्रशांत गुरव, ज्युनिअर क्लार्क. श्री. कमलेश गुरव, कर्मचारी सौ. स्वप्ना भुवड श्री.उले यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. या रक्तदान शिबीरात ५० बाटल्या रक्त संकलीत करण्यात आले.
रक्तदान शिबीर आयोजित करण्यात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ श्री. एस. व्ही. जोशी, एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी प्रा. श्री. किशोर लहारे, प्रा. श्री. वाल्मिक जोंधळे एन . एस एस स्वयंसेवक लीडर श्री. श्रेयस जोशी व स्वयंसेवकां यांनी विशेष परिश्रम घेतले, यामुळे सर्वत्र गोखले महाविद्यालय व राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.