सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड ।
क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांची कर्जत विधानसभा मतदार संघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी भेट घेतली.
या भेटीदरम्यान क्रीडा व युवकांच्या कल्याणाविषयी मतदार संघातील विविध विषयांवर चर्चा झाली व या भेटी दरम्यान कर्जत व खालापूर क्रीडा संकुलासाठी निवेदन देण्यात आले. यावर मंत्री सुनिल केदार यांनी लवकरात लवकर निधी उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासन दिले. लवकरच कर्जत व खालापूर मतदार संघातील क्रीडा प्रेमी व खेळाडूंसाठी क्रीडा संकुल उपलब्ध होईल असे सांगितले.








Be First to Comment