अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद कोकण विभागाच्यावतीने सावित्रीच्या लेकींचा गौरव
सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद कोकण विभाग (रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग) यांच्यावतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त रविवारी सावित्रीच्या लेकींचा सावित्रीची लेक गौरव पुरस्काराने धाटाव रोहा येथे सन्मानित करण्यात आले.
यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद राज्य महिला अध्यक्षा मंजिरीताई समीर धाडगे, कोकण विभागीय अध्यक्ष डॉ. राजू जाधव, मावळ तालुका अध्यक्षा स्नेहलताई बाळसराफ, प्रदेश प्रवक्ता प्रा. संतोष विरकर, प्रदेश महिला प्रवक्ता मोनिका काळे, सपना माळी, रोहिणी रासकर, अनिल नळे, मनोज खैरनार,समिर धाडगे आदी उपस्थित होते
यावेळी राज्य महिला अध्यक्ष मंजिरीताई धाडगे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने कर्तबगार महिलांचा सत्काराचा चांगला कार्यक्रम डॉ. राजू जाधव व त्यांच्या सहकार्याने आयोजित केले असल्याचे सांगितले.
मोनिका काळे यांनी तुमच्या आमच्या खांद्यावर जबाबदारी आहे. सावित्रीमाईच्या लेकीनो नुसती डिग्री घेऊन फ्रेम करून न ठेवता सावित्रीमाईची लेक होऊन खऱ्या अर्थाने सावित्रीबाईच्या संघर्षाचे ज्ञानरूपी रोप करत त्याचे पुढे ज्ञानरूपी वृक्षात तुम्हाला रुपांतर करायचे आहे असे सांगितले.
सपना माळी यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आज स्त्री सरपंच ते पायलट व राष्ट्रपती पर्यंत पोहोचले असल्याचे सांगितले.
आपल्या प्रास्ताविकात डॉ. राजू जाधव यांनी कोकणात विविध समाजातील लोक राहत असून या समाजातील कर्तबगार महिलांचा सन्मान क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने करताना आम्हाला आनंद होत असल्याचे सांगितले
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सावित्रीची लेक गौरव पुरस्कार नायगाव सातारा शर्मिला नेवसे, वाई सातारा नीलम जगताप, महाड रायगड शालन शिंदे, महाड-रायगड रुपाली सूर्यवंशी, रोहा रायगड निलोफर जमादार, रोहा रायगड सबा कारानी, मुरुड रायगड स्नेहा पाटील, नागोठणे रायगड प्रफुल्ला पावसकर, चणेरा रायगड उज्वला देशमुख, सुधागड रायगड मीनाक्षी ढोपे, रोहा रायगड नंदा चौधरी, जर्मनी प्राची दाभाडे, तारेघर रायगड रक्षा शिंदे, पिंगळसई रायगड सुचिता वाघमारे, आयपीएल रायगड तृप्ती कोकाटे आदिना देऊन करण्यात आले.
यावेळी प्रा. संतोष विरकर, याचं पुरस्कार विजेत्यांनी मनोगत व्यक्त केले
या कार्यक्रमात सूत्रसंचालनआभार कोकाटे सर यांनी मानले यावेळी मोठ्या संख्येने महिला व नागरिक उपस्थित होते








Be First to Comment