
विज्ञान शाखेतून शाहू सोलंकी तर वाणिज्य शाखेतून मानसा गुप्ता प्रथम
सिटी बेल लाइव्ह / रसायनी–राकेश खराडे #
बारावीच्या परीक्षेत ग्राम सुधार मंडळ,मोहोपाडा संकलित जनता विद्यालय इंग्रजी माध्यमाच्या विद्यालयाचा शास्त्र शाखेचा विद्यार्थी शाहू सोळंकी याने 77.23 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकवला तर मानसा गुप्ता हिने 84 टक्के गुण मिळवून वाणिज्य शाखेत प्रथम क्रमांक मिळविला आहे. शाळेचा शास्र शाखेचा निकाल 94.73 टक्के लागला तर वाणिज्य शाखेचा निकाल 89.66 टक्के लागला आहे.
यावर्षी पहिल्या पाच क्रमांकामध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यात शास्र शाखेतून
प्रथम क्रमांक- शाहू सोळंकी 77.23 टक्के,
द्वितीय क्रमांक-शिंदे कार्तिके 76.15 टक्के ,
तृतीय क्रमांक-घाग गौरी 66.25 टक्के,
चतुर्थ क्रमांक-मुल्ला चिराग 63.07 टक्के,
पाचवा क्रमांक-यादव अभिषेक 69.15 टक्के,
वाणिज्य शाखा
प्रथम क्रमांक-मानसा गुप्ता 84 टक्के,
द्वितीय क्रमांक- पूजा माळी 81.85 टक्के,
तृतीय क्रमांक- मुस्कान शेख 81.08 टक्के,
चतुर्थ क्रमांक-पूजा बाईत 78.65 टक्के,
पाचवा क्रमांक- अपर्णा झाला 76.92 टक्के गुण मिळवून सुयश संपादन केले आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डाॅ. पी.जी. पळणीटकर,कार्याध्यक्ष सुदाम मुंढे ,सचिव एस.यू.म्हसकर तसेच मुख्याध्यापक बि.एस.वारे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.






Be First to Comment