Press "Enter" to skip to content

प्रशांत मुळे याच्यावर तळोजा पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

सिटी बेल लाइव्ह । तळोजा ।

देविच्यापाड्यातील पञकार वचन गायकवाड व त्यांचे मोठे बंधू मिलिंद गायकवाड यांना देविच्यापाड्यातील गावदेवी मंदीरात दिनांक 5 जानेवारी 2021 रोजी  11 ते 12.30 च्या दरम्यान  दोन पंच व पाच सहा लोकांच्या समोर  शिविगाळ करणे, तसेच गावातील ग्रामस्थां समोर अपमानित केले तसेच वचन गायकवाड व त्याचे भावाला देविच्यापाड्यातील आठवडा बाजारात धंदा करू देयाच नाही. तसेच तुम्ही वचन गायकवाडची कोणतीही मदत घेवू नका. वचन गायकवाड हा बौद्ध समाजाचा आहे. आपल्या जातीचा नाही म्हणून त्याला तुम्ही मुलांनी जवळ घेवू नका. वचन गायकवाडला मी बघून घेईन, त्याच्या प्रत्येक कामात मी अडथळा निर्माण करीन अशा प्रकारची धमकी व अपमानित केल. त्या दोन भावाना जर तुम्ही आठवडा बाजारात धंदा करू दिला किवा त्याची मदत घेतली तर मी तुम्हा गाववाल्यांना हि ञास देईन. या अनुषंगाने सुधारीत कायद्यानुसार 1989 कलम नुसार देविच्यापाड्यातील बेकायदेशीर धंदे करणारा व गुंड प्रवुत्तीचा प्रशांत हनुमंत मुळे यांच्यावर आज दिनांक 7 जानेवारी 2021 तळोजा पोलिस स्टेशनमध्ये ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रशांत मुळे याच्यावर तळोजा पोलिस स्टेशनमध्ये गंभीर स्वरूपाचे दोन गुन्हे दाखल असून एक महिन्यापूर्वी आईला व बायकोला मारहाण प्रकरणी त्याच्या घरातून वेपन (गावठी कट्टा) तळोजा पोलिसांनी जप्त केला आहे. तसेच नितलस येथील बौद्ध समाजाचा शरद गायकवाड याला सुद्धा एक महिन्यापूर्वी धमकावण्यात आल होत. त्यालाही घोडा दाखविण्याचा प्रयत्न या प्रशांत  मुळे यांनी केला होता. या संबधित सुद्धा तळोजा पोलिस ठाण्यात प्राथमिक स्वरूपाचा गुन्हा नोंद झालेला आहे.
      

पोलीस उपायुक्त  शिवदास पाटील यांच्या आदेशानंतर आज दिनांक 7जानेवारी 2021 रोजी तळोजा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक काशिनाथ चव्हाण यांनी प्रशांत मुळे याच्या विरोधात  ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून घेतला. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अधिनियम 1989 कलम  ३(१)(झेड-ए)(ड),३(१)(झेड-ए) (ई), ३(१)(झेड-सी), ३(१)(आर),३(२)(पाच-ए)या व्यतिरिक्त आयपीसी चे कलमे  ५०४,५०६ अंतग॔त ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी प्रशांत मुळे याच्या पासून वचन गायकवाड यांच्या जीवाला धोका आहे.

त्यामुळे या प्रशांत मुळेला लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी देविच्यापाड्यातील गायकवाड कुटुंबियांनी केली आहे. या गुन्ह्या संबधीत पुढील तपास सहाय्यक पोलिस आयुक्तांकडे वग॔ केला जाईल असे तळोजा पोलिसांनी सागितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.