Press "Enter" to skip to content

समीक्षा वशेणीकर च्या मृत्यूमागे घातपाताचा संशय

बेपत्ता झालेल्या १५ वर्षीय समीक्षा मधुकर वशेणीकर चा गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला चिरनेरच्या डोंगरात

सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू ।

तालुक्यातील चिरनेर कातळपाडा गावातील १५ वर्षीय समीक्षा मधुकर वशेणीकर ही मुलगी बेपत्ता होती. तिचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह चिरनेरच्या डोंगरात सापडला. परंतु समीक्षा वशेणीकरचा मृतदेह पाहून ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

चिरनेर कातळपाडा गावातील समीक्षा वशेणीकर ही १५ वर्षीय मुलगी घरात आई ओरडली म्हणून ३ जानेवारी रोजी दुपारी २ वाजल्यापासून घरातून रागाने निघून गेली होती. बेपत्ता झाल्यानंतर समीक्षाचा मृतदेह अक्कादेवी डोंगराच्या बाजूलाच असलेल्या शिलोत्री डोंगरात गळफास घेतलेल्या अवस्थेत ५ जानेवारीला सापडला. त्यामुळे समीक्षानी आत्महत्या केल्याचे बोलले जाते.

समीक्षा वशेणीकर या मुलीने आत्महत्या केली असेल तर तिचा मृतदेह ज्या गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला त्यावेळी तिचे पाय जमिनीला ढोप्या पासून दुमडलेल्या अवस्थेत होते. तसेच ज्या ठिकाणी फास घेण्यासाठी झाडाला साडी बांधण्यात आली होती.

त्याठिकाणा पर्यंत ती पोहचू शकत नसल्याचे बोलले जाते.
त्यामुळे समीक्षानी आत्महत्या केली नसून तिची गळा आवळून हत्या करून नंतर गळफास देऊन आत्महत्या केल्याचा देखावा निर्माण केला असल्याचा संशय व्यक्त होऊन नाक्यांनाक्यावर ही आत्महत्या नसून घातपात असल्याची चर्चा सुरू आहे. तरी समीक्षाच्याची जर हत्या करण्यात आली असेल तर त्याची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.