Press "Enter" to skip to content

राजे प्रतिष्ठान कामगार सेनेमार्फत पत्रकार योद्ध्यांचा सन्मान

सिटी बेल लाइव्ह । नवीन पनवेल । प्रतिनिधी ।

श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे पत्रकार दिनाचे औचित्य साधत पनवेलमधील ज्येष्ठ तसेच श्रेष्ठ पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.

कोरोना काळामध्ये आरोग्य सेवक, पोलीस प्रशासन शासकीय कर्मचारी, डॉक्टर, सुरक्षा रक्षक यांनी कोविड योद्ध्यांप्रमाणे कार्य केले असले तरी या सर्वांचा या सर्वाना प्रसिध्दी देऊन व जनतेसमोर सर्व बाजू मांडणार्‍या पत्रकार बंधूंनी देखील कोरोना काळामध्ये एखादया योध्द्याप्रमाणेच काम केले आहे याची जाणीव ठेवूनच पत्रकारिता पुरस्कार 2021 या पुरस्काराने पनवेलमधील पत्रकारांना सन्मानित करण्यात आले. तसेच यावेळी मराठी भाषेतील पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवणारे पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांना उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात करण्यात आले.

या कार्यक्रमास पनवेल महानगर पालिकेच्या महापौर सौ. कविता चौतमोल, पनवेल महानगरप्रमुख शिवसेना रामदास शेवाळे, नगरसेवक राजू सोनी, राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र संघटक अशोक शिगवण उर्फ अच्चूभाई, महाराष्ट्र कार्याध्यक्ष प्रकाश कोळी,महाराष्ट्र सरचिटणीस चंद्रकांत धडके उर्फ मामासाहेब, सचिव मंगेश लाड, सहचिटणीस सचिन लोखंडे, ठाणे जिल्हाध्यक्ष योगेश महाजन, नवी मुंबई अध्यक्ष डॅनी डिसोझा, महाराष्ट्र महिला अध्यक्षा अर्चना पार्टे यांच्या हस्ते पत्रकारांना पुरस्कार देण्यात आले.

पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ व समाजाचा आरसा म्हणून ओळखला जातो तसेच पत्रकार हे समाजाला दिशा देण्याचे काम अविरतपणे करीत असतात याची जाणीव ठेवूनच तसेच पत्रकारिता समाज जीवनात बदल घडवून आणण्याचे प्रभावी माध्यम आहे. आजवरच्या पत्रकरितेच्या इतिहासात असे अनेक बदल समाजात, व्यवस्थेत घडून आले आहेत. फक्त बातम्या देवून पत्रकारांचे काम संपत नाही, तर त्यापलीकडे जावून समाजात बदल, परिवर्तन घडवून आणावं लागतो. या सर्वांची दखल घेऊनच राजे प्रतिष्ठान कामगार सेनतर्फे रायगड नगरीचे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार सुनील पोतदार, ज्येष्ठ पत्रकार माधवराव पाटील, दैनिक किल्ले रायगडचे संपादक प्रमोद वालेकर, कोकण संध्याचे मुख्य संपादक दिपक महाडिक,सिटी बिल लाईव्हचे समुह संपादक विवेक पाटील, सिटी बेल लाइव्ह चे समुह संपादक मंदार दोंदे, पनवेल युवाचे संपादक निलेश सोनावणे, दैनिक सामनाचे प्रतिनिधी संजय कदम, पनवेल प्रेस क्लबचे संस्थापक अध्यक्ष संतोष घरत, दैनिक पुढारीचे जेष्ठ पत्रकार दिपक घोसाळकर, जेष्ठ छायाचित्रकार भालचंद्र जुमलेदार, दैनिक पुढारीचे पत्रकार रवींद्र गायकवाड, दैनिक रामप्रहरचे हरेश साठे, साम्राज्य न्यूजच्या साक्षी सागवेकर, आदिवासी सम्राटचे संपादक गणपत वारगडा, न्यूज बँडच्या पत्रकार रिया जॉर्ज, पत्रकार मिलिंद खारपाटील, पत्रकार संतोष सुतार, दैनिक लोकमतचे पत्रकार अरुणकुमार मेहेत्रे यांना त्यांनी पत्रकार क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेऊन सन्मानित करण्यात आले. तसेच यावेळी पत्रकारांना वेळोवेळी मदत करणारे अ‍ॅड. मनोहर सचदेव यांना झुलेलाल बेडापार हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

या पुरस्कार सोहळा कार्यक्रमास राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे सहचिटणीस केवल महाडिक यांनी विशेष मेहनत घेतली, तर यावेळी राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या महाराष्ट्र सचिव भारती मोरे, नवी मुंबई महिला सचिव स्नेहा चांदोरकर, नवीन पनवेल शहराध्यक्ष संतोष आमले, खांदा कॉलनी अध्यक्ष मच्छीन्द्र पाटील, उपाध्यक्ष विजय दुंदरेकर, कोळखा पेठ अध्यक्ष आनंद सुरते, कैलास रक्ताटे, ओमकार महाडिक, अनुराग आमले, पत्रकार राजेंद्र कांबळे, पत्रकार सुधीर पाटील, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायदळ प्रमुख सरनौबत पिलाजी गोळे यांचे 14 वे वंशज आणि मी 24 तास चे संपादक अनिल गोळे, चिरनेर फेम महेश खुटे, वैभव महाडिक यांच्यासह राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.