Press "Enter" to skip to content

कर्जत नगरपरिषद कर्मचारी व अधिकारी यांची मोफत रक्त तपासणी

सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड ।

ॲनिमिया मुक्त भारत योजनेअंतर्गत कर्जत नगर परिषदेच्या कर्मचारी व अधिकारी वर्गाची मोफत रक्त तपासणी करण्यात आली.

नगरपरिषदेच्या सभागृहात तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांच्या हस्ते तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नगरपरिषदेचे कर्मचारी अधिकारी सदस्य यांची सीबीसी, शुगर, थायरॉईड आदी तपासणी करण्यात आली.

हिंदलॅब अर्पणा ढाकवळ यांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी करण्यात आली. याप्रसंगी नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते या सर्वांनी तपासणी करून घेतली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.