Press "Enter" to skip to content

धनुष सानपची देशसेवेसाठी गरुडझेप

सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।

रायगड जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांचे सुपुत्र कु.धनुष मनोज सानप याने केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत सन 2019 मध्ये एनडीए / इंडियन नेव्हल अकॅडमी येथील प्रवेशाकरिता घेतलेल्या देशपातळीवरील स्पर्धा परीक्षेत 553 वा क्रमांक पटकावून आता तो इंडियन नेव्हल अकॅडमी, एझिमला, जि.कन्नूर, राज्य-केरळ येथे चार वर्षाच्या प्रशिक्षणासाठी दाखल झाला आहे.

धनुषने देशसेवेचा आणि करिअरचाही एक उत्तम मार्ग म्हणून इंडियन नेव्हल अकॅडमीची निवड केली. येथील चार वर्षांच्या खडतर प्रशिक्षणानंतर धनुष वयाच्या साडे एकविसाव्या वर्षी भारतीय नौसेनेमध्ये सब-लेफ्टनंट या अधिकारी पदावर रुजू होईल.

येथे प्रवेश मिळविताना त्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाची देशपातळीवरील लेखी स्पर्धा परीक्षा, एस.एस.बी मुलाखत (Services Selection Board Interview) व सैन्यदलामध्ये आवश्यक असलेली वैद्यकीय चाचणी हे टप्पे पार पाडले आहेत.

त्याच्या या यशामध्ये औरंगाबाद येथील “सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्था” (Services Preparatory Institute, Aurangabad) या शासकीय प्रशिक्षण संस्थेचा सिंहाचा वाटा आहे.धनुषने त्याचे इयत्ता दहावी पर्यंतचे शालेय शिक्षण केंद्रीय विद्यालय, ओएनजीसी,पनवेल येथून तर इयत्ता अकरावी आणि बारावीचे शिक्षण त्याने सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्था, औरंगाबाद येथून पूर्ण केले आहे.धनुषला दहावीमध्ये 93 टक्के तर बारावीमध्ये 79 टक्के गुण मिळाले होते.

मागील वर्षीच धनुषची 17 वर्षांखालील वयाेगटातून राष्ट्रीय फुटबॉल संघात महाराष्ट्र राज्यातर्फे निवड झाली होती. धनुष फुटबॉलसह लॉन-टेनिस, बास्केटबॉल, टेबल टेनिस या खेळांमध्येही पारंगत असून त्यास इंग्रजी व जर्मन भाषेची त्याचबराेबर अभिनयाची विशेष आवड आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.