Press "Enter" to skip to content

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सुधागड तालुक्यातील शिक्षीकांचा गौरव व सत्कार

सावित्रीमाई फुले जयंतीनिमित्त कार्यक्रम

सिटी बेल लाइव्ह । पाली/बेणसे । धम्मशील सावंत ।

क्रांतीज्योती  सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सुधागड तालुक्यात विविध सामाजिक, प्रबोधनात्मक, वैचारिक व लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात बाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे रविवारी (दि.3) पालीमध्ये सुधागड तालुक्यातील महिला शिक्षकांचा शाल व रोपटे देऊन गौरव व सत्कार करण्यात आला.

स्त्रीशिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या त्याग व समर्पणातून महिला सक्षम झाल्या. आज महिला विविध क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती साधताना दिसत आहेत. स्त्रियांना मान, सन्मान व प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या खऱ्या हकदार सावित्रीमाई आहेत. त्यांच्या  जयंतीनिमित्त महिला शिक्षीकांचा केलेला हा गौरव अभिमानास्पद असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा गीता पालरेचा यांनी यावेळी सांगितले.

     या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हा अध्यक्षा गीता पालरेचा, माजी सभापती साक्षी दिघे, तालुका अध्यक्षा रूपाली भणगे, शहर अध्यक्षा सुजाता वडके, युवती अध्यक्षा मिसाळ, निता मोरे अयोध्या शिंदे, खवली सरपंच रुचिता बेलोसे व सई शेवाळे आदी पदाधिकारी उपस्थित होत्या.

     यावेळी प्रमिला म्हात्रे, अनिता तांबोळी, संगीता बैकर सुनीता पवार, स्वाती फाळे, रश्मी लखीमळे, रोहिणी खामकर, रंजना मोकल, दर्शना ठाकूर, प्रतिभा मोरे, सुनीता पालकर, वंदना लहाने, वृषाली गुरव, सोनाली कुलकर्णी, स्मिता जगताप,सुप्रिया भिलारे, देवयानी हुले, सुनिता बांगारे, रश्‍मी पाटील, अर्चना चौधरी व मोनिका फुंदे या महिला शिक्षिकांचा सत्कार करण्यात आला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.