सिटी बेल लाइव्ह । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे ।
रोहे तालुक्यातील पुई या गावी संपूर्ण ग्रामस्थांच्या सहयोगाने ज्ञानाम्रुत ग्रंथालयाची स्थापना करून उद्घाटन सोहळा नववर्षाच्या प्रारंभी करण्यात आला आहे.
शास्त्रास्य विद्ये प्रतिपत्तये या सुभाषिताच्या अर्थाने वाचन संस्कृतीचे महत्त्व वाढावे,तसेच वाचन संस्कृती जोपासली जावे त्याचप्रमाणे प्रत्येकाने वाचनाचा छंद जोपासावा या अनुषंगाने ग्रा.पं.हद्दीतील पुई या गावामध्ये ज्ञानाम्रुत ग्रंथालय, वाचनालय व व्रुत्तपत्र वाचनालय सुरू करण्यात आले आहे. या ग्रंथालयाचा शानदार उद्घाटन सोहळा ग्रा.पं.सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य,ग्रामसेवक, पोलिस पाटील,गाव कमिटीचे पदाधिकारी, अंगणवाडी व आशा सेविका, संपूर्ण ग्रामस्थ, महिला व तरुण वर्गाच्या उपस्थितीत पार पाडण्यात आला.
सध्याच्या धावपळीच्या व तंत्रज्ञानाच्या युगात थोडावेळ काढून मनाला आणि शरीराला आराम मिळावा म्हणून उत्सासवर्धक म्हणून वाचनाकडे पाहिले जात आहे. संपूर्ण पुई ग्रामस्थांच्या विशेष संकल्पनेतून एकत्रितपणे हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. गावातील प्रत्येक वाचनप्रेमी नागरिक, तरुणवर्ग व बालकांच्या भावी वाटचालीसाठी मोलाची जबाबदारी ज्ञानाम्रुत ग्रंथालयाचे माध्यमातून निश्चितच पार पाडली जाईल असा विश्वास वाचनप्रेमी नागरिकांनी या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केला आहे.








Be First to Comment