सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड ।
हुतात्मा हिराजी पाटील ज्यु कॉलेज कडाव तर्फे 78 वा हुतात्मा स्मृती दिन कार्यक्रम कडाव येथे संपन्न झाला.
याप्रसंगी आदिवासी समाजसेवक गुरुनाथ हंबीर तसेच महाराष्ट्र न्यूज 24 चे वृत्त निवेदक अरुण बैकर यांनी आझाद दस्ता या क्रांतिकारी संघटनेच्या कार्याबद्दल व समाजिक भान राखणेबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच वसंत जाधव शालेय समिती सदस्य तथा नसरापुर ग्रामपंचायत समितीचे मा. सरपंच संतोष कोळंबे ह्यांनी हुतात्मा भाई कोतवाल व हुतात्मा हिराजी पाटील यांच्या स्मृतींना उजाळा देवुन ज्ञानकमल शिक्षण संस्था वांगणीच्या कार्याचा गौरव केला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात संस्थेच्या अध्यक्षा आणि प्राचार्या मनिषा बैकर ह्यांनी उपस्थितांना हुतात्मा भाई कोतवाल व हुतात्मा हिराजी पाटील यांनी देशासाठी केलेल्या त्यागाची माहिती दिली. तसेच संस्थेच्या माध्यमातुन राबविण्यात येत असलेल्या व भविष्यात राबविण्यात येणा-या उपक्रमाबाबत माहिती विषद केली.
आदिवासी समाजसेवक गुरुनाथ हंबीर तसेच त्यांच्या पत्नी आदिवासी समाजसेविका कविता निरगुडे कर्जत पंचायत समितीच्या उपसभापती भिमाबाई पवार, महाराष्ट्र News 24 चे वृत्त निवेदक अरुण बैकर, जिल्हा परिषद सदस्या सहारा कोळंबे, नसरापुर ग्रामपंचायतीचे मा.सरपंच संतोष कोळंबे, शालेय समिती सदस्य वसंत जाधव, हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ बार्शीचे संचालक राहुल पांडे, शालेय समिती सदस्या श्रीमती दिपाली दिलीप माळी, प्राचार्या प्रा. मनिषा बैकर, संस्थेचे सचिव नामदेव बैकर तसेच क.महाविद्यालयाचे सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रेम जयस्वाल, साहिल निगुडसे, अरबाज शेख, सुजल गायकवाड, आदित्य झगडे, संदीप निगुडसे, ह्या विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली.








Be First to Comment