Press "Enter" to skip to content

पै.फरमान दफेदार यांना मरणोत्तर कुलाबा जीवन गौरव पुरस्कार

सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार ।

नागोठणे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व काँग्रेसचे जिल्हास्तरीय नेते पै. फरमानशेठ दफेदार यांनी त्यांच्या जीवनात केलेले सामाजिक कार्य तसेच कोरोना महामारी व निसर्ग चक्रीवादळात सर्वसामान्य जनतेला केलेली मदत याची दाखल घेऊन भाई जगताप मित्रमंडळ रायगड, मधूशेठ ठाकुर चॅरिटेबल ट्रस्ट अलिबाग, शिवकलाम सामाजिक मित्रमंडळ व महाराष्ट्र युवक काँग्रेस यांच्या वतीने अलिबाग येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात पै. फरमानशेठ दफेदार यांना मरणोत्तर कुलाबा जीवन गौरव राष्ट्रीय पुरस्कार २०२१ प्रदान करण्यात आला.

दरम्यान कोरोना महामारीने दानशूर व्यक्तिमत्व पै. फरमानशेठ दफेदार यांचा बळी घेतला होता. अलिबाग चेंढरे येथील भाग्यलक्ष्मी हॉल येथे हा पुरस्कार सोहळा पार पाडला. पै. दफेदार यांना प्राप्त झालेला पुरस्कार त्यांचे चिरंजीव सद्दाम दफेदार व रमीज दफेदार यांनी स्वीकारला. या पुरस्कार सोहळ्यास रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री नामदार अदितीताई तटकरे, मुंबई कांग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप, काँग्रेस युवा नेते ऍड. उमेश ठाकुर,प्रविण ठाकुर,राजाभाऊ ठाकुर आदींसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.