Press "Enter" to skip to content

महावीर चक्राने सन्मानित कृष्णाजी सोनावणे यांचा 23 वा स्मृतिदिन संपन्न

सिटी बेल लाइव्ह । मिलिंद खारपाटील ।

महावीर चक्राने सन्मानित सुभेदार कृष्णाजी सोनावणे यांचा 23 वा स्मृतिदिन महाड येथे संपन्न झाला.सुभेदार सोनावणे यांनी 1948 च्या नौशेरा येथील भारत…पाक च्या युद्धात 700 पाकिस्तामी सैन्याला ठार करून भारताला विजय मिळवून दिला
होता.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष मयूर जाधव हे होते.कॅप्टन तानाजी साळवी, कॅप्टन जगदाळे, कॅप्टन वाय सी देशमुख , पत्रकार मिलिंद खारपाटील ,नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशज शीतल मालुसरे, हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे,परशुराम दरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.सर्वानी सुभेदार सोनावणे याना मानवंदना दिली.

यावेळी झालेल्या कविसंमेलनात मिलिंद खारपाटील, रिया चोरडेकर, शीतल मालुसरे, संजीवन म्हात्रे आदी कवींनी देशभक्तीपर कविता गायल्याने सर्व उपस्थितांच्या अंगात वीरश्री संचारली. भारत माता की जय, जय भवानी जय शिवाजी, जय जवान जय किसान आदी घोषणांनी महाड परिसर दुमदुमला होता.या स्मृतिदिन सोहळ्याला उरणचे 15 देशप्रेमी उपस्थित होते.

सदर स्मृतिदिन कार्यक्रम आयोजित करणाऱ्या महावीर चक्राने सन्मानित कृष्णाजी सोनावणे चॅरिटी ट्रस्ट ला पनवेल पत्रकार संघ ,टी एम सी क्रीअशन,सहयोग स्नेह सेवा संस्थान द्रोणागिरी स्पोर्टसअसोसिएशन आदीकडून सन्मानित करण्यात आले चे कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विनायक हाटे यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यावेळी भीमराव, रमेश, सुनील, सुरेश, ज्योती या सुभेदार सोनावणे यांच्या मुलांनी विशेष मेहनत घेतली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.