सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड ।
कर्जत शहरातील अल्ट्रा फिटनेसने समर्पण ब्लड बँक घाटकोपर यांच्या सहकार्याने तिसऱ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात 87 रक्तदात्यांनी रक्तदान करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कोरोनाच्या संकटात राज्यात रक्ताचा तुटवडा असल्याने शासनाने रक्तदान शिबिरे आयोजित करून रक्त संकलन करावे. असे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत अल्ट्रा फिटनेसने सार्वजनिक रक्तदाता राजाभाऊ कोठारी यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
कोठारी यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून शिबिराचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी प्रकाश शिंदे, दीपक गांगल, जितेंद्र कोल्हे, अमोघ जोशी, कैलास पोटे, प्रभाकर करंजकर आदी उपस्थित होते. मिलिंद कनोजिया यांनी सर्वप्रथम रक्तदान करून रक्तदानाचा शुभारंभ केला.
माजी आमदार सुरेश लाड, नगराध्यक्ष सुवर्णा जोशी आदींनी रक्तदान शिबिराला भेट दिली. यावेळी 87 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्त संकलनाचे काम समर्पण पतपेढीच्या डॉ. अर्चना पेडणेकर, शिला वाघमारे, राजश्री कवळे, जयश्री कांबळे, लक्ष्मण नाईक, रवी ढाक आदींनी केले.








Be First to Comment