सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड ।
शिक्षिका, कवयित्री व समाजसुधारक सावित्रीबाई जोतीराव फुले यांच्या जयंती निमित्त त्यांना कर्जत नगरपरिषदेच्यावतीने अभिवादन करण्यात आले.
सावित्रीबाई फुले यांची जयंती, महिला मुक्ती दिन म्हणून साजरा करण्यात येतो. कर्जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी नगरसेविका प्राची डेरवणकर, संचिता पाटील, वैशाली मोरे, नगरपरिषद कर्मचारी रविंद्र लाड, बापू बेहराम, नंदिनी दुसाणे, पूजा कडू, प्रगती म्हसे, सामिया चौगुले, संकेत पाटील आदी उपस्थित होते.








Be First to Comment