Press "Enter" to skip to content

तहसीलदारांच्या आश्वासनानंतर मैदान बचाव समिती चे उपोषण स्थगित

सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड ।

कर्जत शहरातील कोतवाल व्यायाम मंदिराच्या जागेवर नव्याने करण्यात येणारे बांधकाम सुरू आहे. या बांधकामाविरोधात कारवाई करण्याची मागणी मैदान बचाव समितीने केली होती, ही मागणी शासकीय यंत्रणा मान्य करत नसल्याने मैदान बचाव समितीने हुतात्मा भाई कोतवाल यांच्या बलिदान दिनापासून रोजी उपोषण सुरू केले होते.

या उपोषणास कर्जत नाभिक समाज आणि सामाजिक संस्थेच्यावतीने पाठींबा देण्यात आला होता,मात्र रात्री उशिरा तहसीलदार विक्रम देशमुख आणि पोलीस निरीक्षक अरुण भोर यांच्या मध्यस्थीनंतर सदर उपोषण मागे घेण्यात आल्याचे ऍड. ऋषिकेश जोशी यांनी सांगितले. 

कर्जत नगरपरिषद हद्दीतील सिटी सर्वे नंबर ११/१९ मध्ये गैरमार्गाने सुरु असलेल्या बांधकामाबाबत तहसील कार्यालयाकडे विविध तक्रारी अर्ज दाखल झाले आहेत. तरी देखील गेल्या दोन वर्षात अधिकारी आणि घोटाळा करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कोणतीही कारवाई केलेली दिसून आलेली नाही. तसेच, कर्जत नगरपालिका तत्कालीन मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी देखील मैदान म्हणून वापरण्यास दिलेल्या जागेवर बांधकामाचा आराखडा मंजूर केलेबाबत अहवाल दिलेला आहे. त्यानुसार शर्थभंग झाल्याचे वस्तुनिष्ठ पुरावे शासनाकडे प्राप्त झाले आहे. असे असतानादेखील जाणीवपूर्वक कारवाई केली जात नसल्याचे आरोप या निवेदनात करण्यात आले आहेत.

1जानेवारी 2021 पर्यंत सदर जमिनीवरील बांधकाम थांबवणेबाबत आणि जमीन शासनजमा  करण्यास  कारवाई करण्याची मागणी केली होती.
शनिवारी कर्जतमधील नाभिक समाज बांधवांची दुकाने बेमुदत काळा करता बंद ठेवून संस्थेच्यावतीने कर्जत येथील टिळक चौक येथे आमरण उपोषण करण्यात आले.

यावेळी, राहुल कोकरे आणि हुतात्मा कोतवाल व्यायाम शाळा संघर्ष समितीचे ऍड. हृषिकेश जोशी उपोषणास बसले होते. मात्र, शनिवारी रात्री उशिरा कर्जतचे तहसीलदार विक्रम देशमुख आणि पोलीस निरीक्षक अरुण भोर यांनी उपोषणस्थळी येऊन संबंधितांवर 15 दिवसांत कारवाई करण्यात येईल असे सांगून उपोषण मागे घ्या अशी विनंती उपोषण कर्त्यांना केली, मात्र ही मागणी उपोषण कर्त्यांना मान्य नव्हती अखेर त्यावर चर्चा होऊन 10 दिवसांच्या मुदतीत संबंधितावर कारवाई करण्यात येईल असे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी सांगितले, उपोषण कर्त्यांनी यावर विचार करून उपोषण स्थगित करण्यात आले.

शुक्रवारी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी यांच्या दालनात सुनावणी झाली होती. त्यात पोलीस, टीआयएलआर, नगरपरिषद आणि तहसीलदार उपस्थित होते. त्यांनी आवश्यक कागदपत्रे सादर केली. प्रशासनाने सखोल कारवाईस आवश्यक वेळ मागितली. ती समितीस मान्य झाल्याने उपोषण स्थगित करण्यात आल्याचे ऍड. ऋषिकेश जोशी यांनी सांगितले.   

मैदानाचा सर्व जुना रेकॉर्ड सापडला
दरम्यान, महत्वाचे म्हणजे शासनाला मैदानाचा सर्व जुना रेकॉर्ड सापडला असून त्यांनी तो खरा असल्याचे मान्य केल्याने पुढील कारवाईस मैदान बचाव समितीस बळ आले आहे. 1972 रोजी याच मैदानावर विविध मैदानी खेळासाठी टाऊन प्लॅनिंग यांच्याकडून विविध मैदानी कोर्टाचा प्लॅन मंजूर केला असून तो रद्द न करताच मैदान प्रयोजनाच्या महसुली जागेवर नगरपरिषद यांच्याकडून एक वेगळा प्लॅन मंजूर करण्यात आलेला आहे; ही चूक प्रशासनाने कबूल केल्याचे ऍड जोशी यांनी सांगितले.

तसेच, मागण्या मान्य न झाल्यास 26 जानेवारी रोजी पुन्हा उपोषणाला बसणार असल्याचा इशारा ऍड जोशी यांनी दिला आहे. जिल्ह्यातून उपोषणाला पाठिंबा रायगड जिल्हा नाभिक तरुण संघाचे अध्यक्ष सुदाम शिंदे, कार्याध्यक्ष रवींद्र देवकर, सचिव अनंत खराडे, उपाध्यक्ष भगवान निमुतकर, अशोक यादव, दिलीप शिंदे, राजेश क्षीरसागर यांच्यासह नाभिक समाज संघाचे महाड, खोपोली, अलिबाग, उरण, भिवंडी, माणगाव, पोलादपूर आणि कर्जतचे पदाधिकारी उपस्थित होते. 

तसेच, भाजपा तालुकाध्यक्ष मंगेश म्हसकर, उपनराध्यक्ष अशोक ओसवाल, नगरसेवक बळवंत घुमरे यांनी उपोषण स्थळी येऊन पाठिंबा दिला होता.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.