सिटी बेल लाइव्ह । मुकुंद रांजाणे । माथेरान ।
” काळोखातून पहाटेचा ये विजयाचा तारा, प्रणाम माझा पहिला तुजला मृत्युंजय वीरा” ब्रिटिश सत्तेला नामोहरम करणारे माथेरानचे सुपुत्र वीर हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील यांना २ जानेवारी १९४३ रोजी मुरबाड येथील सिद्धगडावर पहाटे ०६-०२ वाजता वीर मरण आले होते त्यांची ७८ वी पुण्यतिथी दि.२ जानेवारी रोजी येथील नौरोजी उद्यानात साजरी करण्यात आली.
पहाटे साडेपाच वाजता नौरोजी उद्यानातून मशाल फेरी काढण्यात आली.
०६-०२ वाजता माथेरान नगरीच्या उत्तम प्रशासक कार्यसम्राट नगराध्यक्षा प्रेरणा प्रसाद सावंत यांच्या शुभहस्ते पुण्यज्योत प्रज्वलीत केली. हुतात्मा भाई कोतवाल यांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर उपस्थित मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्ध पुतळ्याला शिवसेनेचे शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.स्वातंत्र्य सैनिकांच्या नामफलकास विद्यमान नगरसेविका सुषमा जाधव यांनी तर हुतात्मा स्मारक येथे हुतात्म्यांच्या शिल्पास शिक्षण समिती सभापती प्रतिभा घावरे यांच्या हस्ते पुष्पहार, हुतात्मा स्मारक येथील हुतात्मा भाई कोतवाल यांच्या प्रतिमेला उपनगराध्यक्ष आकाश चौधरी यांच्या हस्ते आणि अन्य अज्ञात हुतात्म्यांच्या नामफलकास नगरसेविका नजमा शारवान यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी गटनेते,बांधकाम सभापती प्रसाद सावंत,मुख्याधिकारी प्रशांत जाधव, नगरपालिका कार्यालय अधिक्षक रणजित कांबळे,वनसंरक्षक समिती अध्यक्ष योगेश जाधव, माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर, विरोधी पक्षनेते शिवाजी शिंदे,सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे,माजी नगरसेवक अवधूत येरफुले,प्रकाश बाळकृष्ण सुतार,प्रदीप घावरे, कुलदीपभाई जाधव,कोतवाल ब्रिगेड अध्यक्ष रोहिदास क्षीरसागर, चर्मकार समाज अध्यक्ष सूर्यकांत कारंडे,नगरपरिषद प्राथमिक शाळा आणि गव्हाणकर ट्रस्ट शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद तसेच आजी माजी नगरसेवक, नगरसेविका,विविध मंडळांचे पदाधिकारी,नागरिक यावर्षी पहिल्यांदाच मोठया संख्येने उपस्थित होते.








Be First to Comment