Press "Enter" to skip to content

मोहोपाड्यात हुतात्मा वीर कोतवाल जयंती साजरी

सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।

मोहोपाडा व शिवनगर येथील नाभिक समाजाने एकत्रित येऊन मोहोपाडा बाजारपेठेतील जयेश गायकवाड यांच्या हेअर सलूनमध्ये हुतात्मा वीर कोतवाल यांची जयंती साजरी केली.यासाठी परीसरातील नाभिक समाज एकत्रित आला होता.

यावेळी हुतात्मा वीर कोतवालांच्या प्रतिमेचे नाना गायकवाड यांच्या हस्ते पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. नाना गायकवाड यांनी हुतात्म्यांच्या जिवनपटावर माहिती दिली.त्यांचे बलिदान देशासाठी महत्वाचे असल्याचे नाना गायकवाड म्हणाले . यावेळी रसायनी नाभिक समाजाचे जयेश गायकवाड, गोविंद गायकवाड,संदिप साळुंखे,मंदार गायकवाड,विकी बोरकर आदी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.