सिटी बेल लाइव्ह । श्रीवर्धन । केतन माळवदे ।
येथील गोखले एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागा अंतर्गत मंगळवार, दिनांक. ०५/०१/२०२१ रोजी सकाळी ठिक ०९:३० वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
आपल्या राज्यात कोरोना काळात निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा एक गंभीर समस्या निर्माण झाली होती, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला अनुसरून मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने हा रक्त तुटवडा भरुन काढण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. अशी माहिती एन.एस. एस.विभाग प्रमुख प्रा.किशोर लहारे व प्रा. वाल्मिक जोंधळे यांनी दिली.
१८ वर्षा वरील विद्यार्थी- विद्यार्थीनी व त्यांचे पालक देखील स्वेच्छेने रक्तदान करु शकतात. तसेच श्रीवर्धन शहरातील नागरिकांना देखील रक्तदान करुन शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस.व्ही. जोशी व उपप्राचार्य निलेश चव्हाण महाविद्यालयाचा एन.एस.एस विभाग, श्रीवर्धन येथील उपजिल्हा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.ढवळे यांचेकडून करण्यात आले आहे.
या शिबिराला अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयाच्या कर्मचारी वर्गाचे देखील सहकार्य लाभणार आहे. त्यामुळे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांमधे देखील उत्साह आहे.अशी माहिती प्रा.किशोर लहारे यांनी दिली आहे .







Be First to Comment