सिटी बेल लाइव्ह । खालापूर । मनोज कळमकर ।
शिवसेनेत असताना हवे तसे पाठबळ मिळाले नाहि त्यामुळे सामान्य माणसाला आपली वाटणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करून माडप परिसरात मनसेची ताकद वाढविणार असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते प्रशांत पाटील यांनी सांगितले.
तालुक्यातील अनेक महत्वांच्या समस्येला प्रशांत पाटील यानी वाचा फोडण्याचा प्रयत्न केला होता.तालुक्यातील बेकायदा दगडखाणी संदर्भात त्यांचा प्रदिर्घ लढा सुरू असून अलिबाग येथे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषण देखील प्रशांत पाटील यानी केले होते.परंतु त्यावेळी शिवसेनेच्या तालुक्यातील जेष्ठ नेत्याची हवी तशी साथ त्याना मिळाली नव्हती.परिसरातील कारखान्यातील प्रदूषण,रस्त्याची दुरावस्था यासह अनेक महत्वाच्या प्रश्नाचा सातत्याने तहसीलदारांकडे पाठपुरावा पाटील यानी सुरू ठेवला आहे.
मनसे रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील आणि उपाध्यक्ष जे पी पाटील यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होवून प्रशांत पाटील यानी सहका-यांसह मनसेत प्रवेश केला आहे.मनसेत प्रवेशाने माडप गावातील राजकारण ढवळले गेले आहे. आगामी काळात येणारी निवडणूक मनसे तर्फे प्रशांत पाटील यांची गट निर्णायक ठरणार आहे.परिसरातील बेरोरजारांचा तसेच कंञाटी कामगारांचा प्रश्न मनसे स्टाईल ने मार्गी लागण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रशांत पाटील यानी सांगितले.
खालापूर तालुक्यातील आगामी काळात मनसे प्रशांत पाटील यांच्या कार्यपद्धतीने आक्रमक होताना नक्की दिसणार असून प्रशांत पाटील यांच्या सोबतीला मनसेत तालुक्यातून अनेक जण प्रवेश करणार आहेत.








Be First to Comment