सिटी बेल लाइव्ह । खालापूर । मनोज कळमकर ।
नववर्षात शासनाच्या सूचनेनुसार माझी वसुंधरा अभियान खालापूर नगरपंचायत राबविणार असून विविध कार्यक्रमाचे आयोजन 1जानेवारीला करण्यात आले आहे.नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सकाळी हरित शपथ,जनजागृती रॅली आणि शंभर वृक्ष लागवड अशा कार्यक्रमाचे नियोजन नगरपंचायतीने केले आहे.
खालापूर नगरपंचायतीच्या पटांगणात हरित शपथ कार्यक्रम घेण्यात येणार असून नगरपंचायत कार्यालय ते छञपती शिवाजी चौक अशी जनजागृती रॅली असणार आहे.त्यानंतर नगरपंचायत हद्दीत विविध ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी सुरेखा भणगे यानी दिली आहे.
वसुंधरेच्या प्रति आपली जबाबदारी म्हणून प्रत्येक नागरिकानी हरित शपथ घ्यावी.सर्व सामाजिक नियम पालन करित जेष्ठ नागरिक व लहान मुलांनी घरून या उपक्रमात सहभागी व्हावे.
सुरेखा भणगे-मुख्याधिकारी खालापूर नगरपंचायत








Be First to Comment