सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड ।
माझी वसुंधरा अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी कर्जत नगरपरिषद कार्यालयात नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांच्या उपस्थितीत आज हरित शपथ कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी नगरसेविका पुष्पा दगडे, मधुरा चंदन, डॉ. ज्योती मेंगाळ, भारती पालकर, प्राची डेरवणकर,सुवर्णा निलधे, नगरसेवक बळवंत घुमरे, विवेक दांडेकर आणि कर्मचारी उपस्थित होते.
कर्जत नगरपरिषद कार्यालयात घेण्यात आलेली शपथ…..
मी शपथ घेतो की, 20 किलो कार्बन डाय-ऑक्साइड संस्लेश्राद्वारे हवेत शोषून घेऊन 14 किलो ऑक्सिजन हवेत सोडतो याची जाणीव मला असून त्यासाठी मी स्वतः दहा मोठ्या होणाऱ्या झाडांची लागवड व जोपासना करून तसेच माझे पालक, भाऊ, बहीण आणि माझ्या शेजारी दहा झाडांची लागवड व जोपासना करतील याची दक्षता घेऊन या अभियानातील ते कृतिशील दूध म्हणून मी काम करेन.

मी माझे घर परिसरात स्वच्छ ठेवेन व पर्यावरणाची हानी करणाऱ्या उत्पादनांचा वापर शक्यतो टाळेन. मी माझ्या घरात, परिसरात, कामाच्या ठिकाणी पाण्याचे पुनर्वापर आणि पुनर्भरण तसेच अन्य वस्तूंचा पुनर्वापर करून मी पर्यावरण संस्कृतीला प्रोत्साहन देईन. सौर, बायोगॅस नूतनीकरणक्षम ऊर्जेचा वापर करण्यास प्रोत्साहन देईन. माझे घर परिसर आणि मित्र-मैत्रिणींमध्ये पर्यावरण संवर्धन विषयक जागृतता निर्माण करेन. पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्याच्या माध्यमातून मी पाण्याचे संवर्धन करेन आणि हाच संदेश कुटुंब व मित्र मैत्रिणी पर्यंत पोचवेन.
मी समाजात एक सुज्ञ नागरिक म्हणून माझ्या कुटुंबाच्या भौतिक सामाजिक आर्थिक गरजा पूर्ण करताना पर्यावरण आणि जैवविविधतेचे संवर्धन होईल असे निर्णय घेईन.
नगरपरिषद लिपिक रविंद्र लाड यांनी पर्यावरण संवर्धन शपथ चे वाचन केले त्यामागे सभागृहात उपस्थित सर्वांनी वाचन करून पर्यावरण संवर्धनशपथ घेतली.








Be First to Comment