Press "Enter" to skip to content

कर्जत नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी समीर जाधव

पंकज पाटील यांची तडकाफडकी बदली

सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड ।

कर्जत नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी समीर जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे, त्यांनी आज दि.1जानेवारी 2021 रोजी कार्यालयाच्या कामकाजाची सूत्रे हाती घेतली आहेत.

नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांची काल दि.31 डिसेंबर रोजी सायंकाळी तडकाफडकी बदली झाली असून त्या जागी पनवेल महानगरपालिका सहाय्यक आयुक्त समीर जाधव यांची त्यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली आहे.

डॉ. पंकज पाटील यांनी 14 फेब्रुवारी 2020 रोजी कर्जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी म्हणून सूत्रे हाती घेतली होती, अवघ्या 10 महिन्याच्या कालावधीतच त्यांची तडकाफडकी बदली झाली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.