सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।
रसायनी पाताळगंगा परिसरातील डाॅक्टरांनी एकत्रित येऊन सन 2013 मध्ये रसायनी पाताळगंगा प्रायमा असोसिएशनची स्थापना केली आहे.या असोसिएशनच्यावतीने रसायनी परीसरातील डाॅक्टरबांधव सामाजिक बांधिलकी जोपासत विविध कार्यक्रम, आरोग्य शिबीर,रक्त तपासण्या आदी आयोजित करत असतात.नागरिकांना विविध आजारांवर मार्गदर्शन करण्यात व्यस्त असतात.
शिवाय या परीसरातील डाॅक्टरांच्या क्रिकेट टिमचेही जिल्ह्यात चांगलेच नावलौकिक आहे.जिल्ह्यात नागोठणे येथे डाॅक्टरांच्या होणा-या क्रीडा सामन्यात रसायनी पाताळगंगा प्रायमा असोसिएशनने प्रथम क्रमांकाची लगातार हॅटट्रिक साधत चौथ्या वर्षीही प्रथम क्रमांकाने विजय संपादन केला आहे.सन 2021 या वर्षांकरिता रसायनी पाताळगंगा प्रायमा असोसिएशनच्या अध्यक्षपदाची सभा माॅन्टेरीया रिसाॅर्टमध्ये पार पडली.यावेली अध्यक्षपदाची धुरा डाॅ.रोहीत कदम यांना सोपविण्यात आली.

यावेळी मोहोपाडा येथे दवाखाना असलेल्या रोहीत कदम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.यावेली
प्रमुख पाहुणे म्हणून टिएच ओ डॉ प्रसाद रोकडे, डॉ किरण पवार उपस्थित होते. तर उपाध्यक्ष म्हणून डॉ.श्वेता कानिटकर,
सचिवपदी डॉ निलेश साळुंखे,खजिनदार डॉ संजय कुरंगळे,व डॉ अनिल पाठक , कल्चरल एक्टिवीटी डॉ प्रतिभा महिन्द्रीकर,कॅम्प सेक्रेटरी डॉ विशाल राऊत, स्पोर्टस सेक्रेटरी डॉ प्रशांत जगताप,फुड सेक्रेटरी डॉ.धीरज जैन,डॉ राहुल यादव यांची निवड करण्यात आली.
याप्रसंगी डाॅक्टर मनोज कुचेरीया, डॉ.राजन बागडे , डॉ.लेखा उचिल , डॉ.इंगले, डॉ शाम, डॉ.जोशी आदीसह प्रायमाचे डाॅक्टर उपस्थित होते.








Be First to Comment