सिटी बेल लाइव्ह / खांब-रोहे, (नंदकुमार मरवडे)
रोहे तालुक्यातील श्री क्षेत्र तळवली तर्फे अष्टमी गावचे रहिवासी असलेले तरूण कार्यकर्ते विठोबा चिंदू मरवडे यांचे दु:खद निधन झाले. त्या समयी ते ४७ वर्षांचे होते.
तरूण वयातच विठोबा चिं.मरवडे यांचे दु:खद निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होताना दिसत आहे. तर सध्या कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्यांच्या अंत्यविधीसाठी फक्त मरवडे परिवारातील सदस्स,त्यांचे आप्तस्वकीय व ग्रामस्थ अशी मोजकेच जण उपस्थित होते.सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून त्यांचे अंत्यविधी शोकाकुल वातावरणात उरकण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,एक मुलगी,तीन भाउ,दोन बहिणी असा परिवार असून त्यांंचे दशक्रियाविधी बुध.दि.२२ तर अंतिम धार्मिकविधी शुक्र.दि.२४ जुलै रोजी होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.






Be First to Comment