सिटी बेल लाइव्ह । पाणदिवे । वार्ताहर ।
महाराष्ट्र युवा प्रतिष्ठान पाणदिवे आणि वटवृक्ष सामाजिक संस्था उलवे यांच्या वतीने चिर्ले- गावठण परिसरातील बोटकी वाडीत रायगड जिल्हा परिषद सदस्या कुंदाताई ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माजी राजिप सदस्य वैजनाथ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत बोटकी वाडीतील प्रत्येक कुटूंबास धान्य वाटप करण्यात आले.

यावेळी रायगड भुषण मनोज पाटील यांनी उपस्थित नागरिकांना कोविड महामारी संकटाबाबत मोलाचे मार्गदर्शन करुन सर्वांना आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला. दारुमुक्ती वाडीचा संकल्प ही यावेळी करण्यात आला. सदर कार्यक्रमात प्रत्येकास मास सुद्धा वाटप करुन अत्यंत साधेपणाने कार्यक्रम पार पाडला. कुंदाताईनी बोटकी वाडीसाठी पायाभुत सुविधांसाठी जिल्हा परिषदेकडे केलेल्या मागणीला यश आल्याचे मत तेथे व्यक्त करुन येणाऱ्या नववर्षात वाडीतील सर्व समस्या सुटतील असा विश्वास दर्शविला.

यावेळी वनविभागाचे वनरक्षक सुदाम धांडे, पक्षीमित्र आनंद मढवी, वटवृक्ष सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष नंदेश ठाकुर, स्मिता पाटील,गणेश मढवी विश्रांती घरत, आदि उपस्थित होते.








Be First to Comment