सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू ।
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, पनवेल, जिल्हा- रायगड व रायगड जिल्हा परिषद अलिबाग,शिक्षण विभाग यांच्या वतीने गणित व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या समन्वयाने गट्टी गणिताशी हा नाविन्यपूर्ण असा उपक्रम ऑनलाईन पद्धतीने राबवला जात आहे. गणित विषयातील क्लिष्ट संकल्पना सहज व सोप्या पद्धतीने ऑनलाईन पाठांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी डाएट पनवेल, रायगड चे गणित विभाग प्रमुख श्री.सुभाष महाजन, उपविभाग प्रमुख श्रीम. ममता पवार व विषय सहाय्यक श्री. उस्मान शेख व श्रीम. मनिषा खैरे यांनी जिल्ह्यातील शिक्षकांना या उपक्रमात समाविष्ट केले आहे .
गणितातील वेगवेगळ्या अध्ययन निष्पत्ती वर आधारित पाठ Maths Mystery या यूट्यूब चॅनेल च्या माध्यमातून सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम आयसीटी विभागाचे विषय सहाय्यक श्री.गणेश कुताळ व श्री. राकेश अहिरे हे पहात आहेत.यातील एक विशेष बाब म्हणजे शिक्षकांप्रमाणे विद्यार्थ्यांनाही तांत्रिक मार्गदर्शन तीन दिवस करून तयार करण्याचे सुंदर काम यांनी केले आहे.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, पनवेल जिल्हा -रायगड च्या प्राचार्या श्रीम.चंद्रकला ठोके यांच्या प्रेरणेतून ज्येष्ठ अधिव्याख्याता श्री.सुभाष महाजन व श्री. सागर तुपे यांच्या मार्गदर्शनाने आणि अधिव्याख्याता श्रीम.ममता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले. तांत्रिक बाबींचे नियोजन ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. संजय वाघ व अधिव्याख्याता श्री.राजेंद्र लठ्ठे यांच्या सहकार्याने पूर्ण झाले.
या उपक्रमात श्रीम.मीना फुलपगारे, श्रीम. सीमा ससाणे, श्री.अमोल ठोकळ ,श्रीम. प्रगती नाईक, श्रीम.रुपाली पाटील, श्री.विलास पाटील, श्री. संतोष म्हात्रे, श्रीम. शुभांगी डमाळे, श्रीम. अपर्णा जंगम, श्री.विकास पाटील,श्री.अमित लांभाते ,श्रीम.संचीता सतविडकर व श्री.अनिल पाटील या सर्व शिक्षकांच्या उत्कृष्ठ पाठांची मेजवानी विद्यार्थ्यांना मिळत आहे त्यामुळे गणित विषयातील विविध क्लिष्ट संकल्पना सोप्या पद्धतीने स्पष्ट होऊन विद्यार्थ्यांना गणित विषय अधिकाधिक आवडीचा होत आहे.









Be First to Comment