Press "Enter" to skip to content

नागोठणे लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी लायन संदिप नायर यांची निवड

सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) :

लायन्स क्लब ही जागतिक पातळीवर काम करणारी सामाजिक बांधीलकी जपणारी अव्वल दर्जाची संस्था आहे. याचाच एक भाग असलेली लायन्स क्लब नागोठणे ही संस्था नागोठणे शहर आणि पंचक्रोशी मध्ये सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवीत असते. याच नागोठणे लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी नागोठण्यातील प्रसिद्ध लक्ष्मी टायर्सचे मालक व आपल्या सेवाभावी कार्यासाठी प्रसिद्ध असलेले सर्वांचे आवडते व्यक्तिमत्त्व लायन संदीप आण्णा नायर यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.

लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या नियमानुसार दरवर्षी प्रत्येक क्लबच्या अध्यक्षपदाची निवड होत असते व त्याचा शपथविधी होत असतो. त्यानुसार सन २०२०- २१ या वर्षा करिता ही निवड करण्यात आली आहे.

या वर्षीच्या नवीन पदाधिकाऱ्यांना शपथ देताना एमजेएफ लायन तसेच पास्ट झोन चेअरमन विवेक सुभेकर यांनी लायन्स क्लब इंटरनॅशनल व डिस्ट्रीक्ट यांची माहिती तसेच सर्वांच्या जबाबदाऱ्या विस्तृतपणे सांगीतल्या. तसेच नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शपथ देवून त्यांना अधिकृत पदाधिकारी झाल्याचे यावेळी ला. विवेक सुभेकर यांनी जाहीर केले.

यावेळी मावळत्या अध्यक्षा लायन सुजाता जवके यांनी आपला पदभार नवनिर्वाचित अध्यक्ष लायन संदिप नायर यांच्या सुपूर्द केला.
मागील वर्षाचा आढावा व मनोगत व्यक्त करताना लायन सुजाता जवके यांनी मागील वर्षी सर्व सभासदांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले व सर्वांना पुढील वर्षी सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले.
या वर्षीचे अध्यक्षपदाची जबाबदारी घेताना लायन संदिप नायर यांनी आपले पुढील अॅक्टीव्हीटीज नियोजन तसेच सभासदांच्यासाठी विविध कार्यक्रम, डिस्ट्रीक्ट व क्लब यांचेतील सलोखा अशा अनेक गोष्टींची दखल घेत सर्वाना सोबत घेवूनच काम करणार असल्याचे सांगीतले.

यावेळी एमजेएफ लायन व पास्ट रिजन चेअरमन सुधाकर जवके यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना मानाची लायन्स पीन लावुन सन्मानित केले.
चार्टर प्रेसिडेंट लायन प्रकाश जैन यांनी नवीन टिमला शुभेच्छा देत क्लबच्या उन्नतीसाठी सर्वोतोवरी मदत करण्याचे सांगीतले.
नवीन पदाधिकारी उपाध्यक्ष लायन संतोष झोलगे, सचिव एमजेएफ लायन विवेक सुभेकर, खजिनदार लायन संतोष शहासने यांच्या सोबत इतर पदाधिकारी लायन सुजित महागावकर, लायन विलास चौलकर, लायन पांडूरंग शिंदे, लायन गणेश जाधव , लायन अनिल गिते, लायन अजित घोडींदे, लायन श्वेता चौलकर, लायन श्वेता सुभेकर, लायन पुजा शिंदे यांनांही शपथ देण्यात आली. याप्रसंगी लायन संदिप नायर यांच्या मातोश्री व दोन कन्या त्याचप्रमाणे त्यांच्या पत्नी लायन लेडी विश्वकला नायर यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी लक्ष्मी टायर्सची संपुर्ण टिम त्याचप्रमाणे बाळाराम हॉटेलचे मालक दिनेश धामणे व दिक्षा धामणे यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. या कार्यक्रमादरम्यान विवीध मित्रवर्गाने अध्यक्ष लायन संदिप नायर यांना शुभेच्छा दिल्या.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.