सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड ।विश्वास निकम ।
कोलाड नाभिक विभागाची मासिक सभा आंंबेवाडी येथील समाज मंदिरात संपन्न झाली. त्या मिंटीग मध्ये जुन्या कमेंटी पुन्हा एकदा फेरनिवड करण्यात आली. विभागीय अध्यक्षस्थानी संजय सखाराम सकपाळ , उपाध्यक्षपदी जितेंद्र जाधव , कार्याध्यक्षपदी प्रविण बाळराम पवार, सेक्रेटरीपदी काशिनाथजी खंडागळे, खजिनदापदी निलेश पवार तर दूकान कमेंटी अध्यक्षपदी किशोर खंडागळे अशी सर्वांमते ठरवण्यात आले .
कोलाड हा रायगड जिल्ह्यातील नाभिक संघाचा केंद्रबिदु असल्याने विभागाचा अध्यक्ष पद हे तोलामोलाचे तेवढेच जबाबदारीचे होते. त्यामुळे या वर्षी कोरोना काळातील माजी अध्यक्ष यांनी केलेला सामाजिक मदतीचा एक हात पुढे नेहमीच केला असल्याने विभाग या वर्षी अध्यक्षपदी संजय सकपाळ याची पुन्हा फेरनिवड करण्यात आली.
या विभागीय जनरल मिटिंगचे प्रभाकर मोहिते याच्या अध्यक्षते खाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली . या वेळी समाजातील जेष्ठ नेते खराडे आण्णा, डॉ खराडे, माजी विभाग अध्यक्ष सदानंद सालुंखे, काशिनाथ रावकर, काशिनाथ खडांगळे, एकनाथ मोहिते, हुजरे काका यासह कोलाड विभागातील सर्व समाज बांधव उपस्थित होते. तर संजय सकपाळ याची निवड झाल्याने त्याच्यावर अनेक सामाजिक क्षेत्रातील मडंळीने अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. तर या समातील सर्वच सदस्य यांना सोबत घेऊन आंबेवाडी येथील समाज मंदिराचे वरच्या मजल्याचे काम लवकरात लवकर हे पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करणारच पण त्याचबरोबर सर्वागीण विकासाठी केंंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या सर्व योजनाचा लाभ आपल्याला मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष सकपाळ यांनी सांगितले.








Be First to Comment