Press "Enter" to skip to content

वरोसेवाडीत आदेश बांदेकर यांची दत्त जयंती उत्सवास भेट

सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।

वासांबे मोहोपाडा जिल्हा परिषद विभागातील वरोसेवाडी येथील दत्त मंदिरात दत्त जयंतीनिमित्त सुप्रसिद्ध अभिनेते, सिध्दी विनायक ट्रस्ट चे अध्यक्ष, होममिनिस्टर फेम आदेश बांदेकर यांनी भेट देऊन श्रीदत्ताची मनोभावे पूजा केली.

वरोसेवाडी(मोर्बे धरणग्रस्त) येथील दत्त मंदिरात सालाबादप्रमाणे दत्त जयंतीनिमित्त दीड दिवसाचा सप्ताह साजरा करण्यात आला.सकाळी अभिषेक,काकडा आरती,दर्शन, हरिपाठ,कीर्तन व पालखी सोहळा संपन्न झाला.सायंकाळी महिलांचे लाडके भाऊजी,होममिनिस्टर व सुप्रसिद्ध अभिनेते आदेश बांदेकर यांनी दत्त मंदिरात येऊन श्री दत्ताची पूजा करून दर्शन घेतले.यावेळी त्यांनी ग्रामस्थ यांच्याबरोबर मनमोकळ्या गप्पा मारून महिलांशी संवाद साधला.

ग्रामस्थांच्या वतीने मारुती तवले यांनी त्यांचा सत्कार केला.यावेळी शाखाप्रमुख पंढरी तवले,उपशाखाप्रमुख सुधाकर बेलोसे,तुळशीराम तवले, कोरोना च्या पार्श्वभूमीवर सॅनिटाईझर फवारणी, हॅन्डवॉश चा वापर करून शासकीय नियमांचे पालन करण्यात आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.