सिटी बेल लाइव्ह । काशिनाथ जाधव । पाताळगंगा ।
गेले अनेक महिने कोरोनाच्या पाश्वभुमी वर शाळा बंद असल्यामुळे काही शाळा जरी सुरु झाल्या असल्या तरी सुद्धा प्राथमिक शाळा अजून बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाया जावू या विचारांतून विज्ञान मित्र पल्लवी वाघमारे, रणजीत वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली अंतर्गत उंबरे गावातील स्वयंसेवक निशा भांडेकर यांच्या मदतीने विद्यार्थ्यांनी विज्ञानाचे धड़े दिले जात आहे.
आज विज्ञान युग असल्यामुळे प्रत्येकाकडे मोबाईल आहे.मात्र असे पालक वर्ग आहेत.की त्यांना एक वेळेचे जेवणांची भ्रांत असून ते आपल्या मुलांना मोबाईल कसे घेवून देणार याच विचारांतून लोकवर्गणीतून एक्टिव्हिटी कार्डची प्रिंट च्या माध्यमातून विज्ञानांचे धडे गिरविले जात आहे.
विद्यार्थी हे भविष्यांचे अधार स्थंभ असून त्यांच्या मध्ये विज्ञान विषयी आवड निर्माण होण्यासाठी त्यांना विज्ञान विषयी कुतूहल निर्माण व्हावी हे उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून विज्ञानाच्या उपक्रमाचे कार्ड प्रिंट करून खालापूर तालुक्यातील उंबरे, करगाव, दुरशेत,सावरोली, खरवली, बीड,वडगांव इत्यादी गावांत देण्यात आले आहेत. प्रत्येक गावात जवळपास ५० विद्यार्थी असे जवळपास ३५० /४०० मुलांना २ विषयाचे कार्ड देण्यात आले. ज्यांचा उपयोग करून मुले घरीच कार्ड वाचून त्यांच्या वेळेनुसार उपक्रम करीत असून समजून घेत आहे.
विद्यार्थ्यांना वेळोवेळी एक्टिव्हिटी मिळावी म्हणून गावागावातून लोकवर्गणी किंवा दानशूर व्यक्ती पुढे येत असल्यामुळे विद्यार्थ्यांना हे प्रयोग करण्यासाठी साहित्य उपलब्ध होत आहे.दर शनिवारी विविध विषयांचे प्रयोग सांगितले जात असतात.विशेष म्हणजे त्या विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहचले सुद्धा जात असल्यामुळे ते प्रयोग करण्यासाठी सक्षम झाल्यांचे रणजित वाघमारे यांनी बोलतांना सांगितले.








Be First to Comment